Holi 2026 : स्टाईल, कम्फर्ट आणि सेफ्टी; होळीनिमित्त महिलांसाठी बेस्ट आउटफिट पर्याय, रंगांच्या उत्सवात दिसाल खास!

महिलांनी होळी खेळताना हलके, सैलसर आणि त्वचेला श्वास घेता येतील असे कपडे परिधान करावेत, असे तज्ज्ञ सांगतात.
Holi 2026 : स्टाईल, कम्फर्ट आणि सेफ्टी; होळीनिमित्त महिलांसाठी बेस्ट आउटफिट पर्याय, रंगांच्या उत्सवात दिसाल खास!
Published on

होळीचा सण रंगांचा आणि उत्साहाचा असला तरी योग्य कपड्यांची निवड केल्यास हा आनंद अधिक सुरक्षित आणि आरामदायी ठरतो. महिलांनी होळी खेळताना हलके, सैलसर आणि त्वचेला श्वास घेता येतील असे कपडे परिधान करावेत, असे तज्ज्ञ सांगतात.

Holi 2026 : स्टाईल, कम्फर्ट आणि सेफ्टी; होळीनिमित्त महिलांसाठी बेस्ट आउटफिट पर्याय, रंगांच्या उत्सवात दिसाल खास!
टॅनिंगपासून त्वचेचा बचाव कसा कराल? सनस्क्रीन वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

पांढरा किंवा फिकट रंगाचा कॉटन कुर्ता, त्यासोबत लेगिंग्स, पलाझो किंवा जीन्स हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय मानला जातो. पांढऱ्या रंगावर उधळलेले गुलाल आणि रंग अधिक उठून दिसतात, त्यामुळे फोटोसाठीही हा लूक आकर्षक ठरतो. मात्र, पारदर्शक किंवा अतिशय पातळ कापड टाळावे.

Holi 2026 : स्टाईल, कम्फर्ट आणि सेफ्टी; होळीनिमित्त महिलांसाठी बेस्ट आउटफिट पर्याय, रंगांच्या उत्सवात दिसाल खास!
डी-टॅन म्हणजे काय? त्वचेवरील टॅन कमी करण्यासाठी किती फायदेशीर, जाणून घ्या माहिती

होळीमध्ये पाण्याचा वापर जास्त होत असल्याने सिल्क, शिफॉन किंवा महागडे ड्रेस टाळावेत. कॉटन, रेयॉन किंवा हलके डेनिम हे फॅब्रिक अधिक योग्य मानले जाते. आजकाल अनेक महिला पांढरा टी-शर्ट आणि डेनिम शॉर्ट्स किंवा जीन्स असा फ्युजन लूक निवडतात.

Holi 2026 : स्टाईल, कम्फर्ट आणि सेफ्टी; होळीनिमित्त महिलांसाठी बेस्ट आउटफिट पर्याय, रंगांच्या उत्सवात दिसाल खास!
जिमशिवायही राहा फिट! दररोज स्वतःला द्या फक्त २० मिनिटं; जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

पारंपरिक अंदाज हवा असल्यास पांढरा अनारकली, लॉन्ग कुर्ता किंवा इंडो-वेस्टर्न सेट उत्तम पर्याय ठरतो. डोक्यावर स्कार्फ किंवा कॅप, डोळ्यांसाठी सनग्लासेस आणि पायात आरामदायी चप्पल किंवा शूज वापरल्यास रंगांपासून संरक्षण होऊ शकते.

Holi 2026 : स्टाईल, कम्फर्ट आणि सेफ्टी; होळीनिमित्त महिलांसाठी बेस्ट आउटफिट पर्याय, रंगांच्या उत्सवात दिसाल खास!
परफेक्ट मेकअपसाठी फाऊंडेशन कसं लावायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

यासोबतच, काही अतिरिक्त काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. होळीपूर्वी त्वचेवर आणि केसांवर तेल लावल्यास रंग सहज निघण्यास मदत होते. जास्त दागिने, मौल्यवान ॲक्सेसरीज किंवा घड्याळ वापरणे टाळावे. पूर्ण बाह्यांचे कपडे घातल्यास त्वचा थेट रंगांच्या संपर्कात येत नाही.

Holi 2026 : स्टाईल, कम्फर्ट आणि सेफ्टी; होळीनिमित्त महिलांसाठी बेस्ट आउटफिट पर्याय, रंगांच्या उत्सवात दिसाल खास!
सुंदर आणि निरोगी त्वचेचा मंत्र; झोपण्यापूर्वी 'अशी' घ्या त्वचेची काळजी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे फॅशनपेक्षा सुरक्षेला प्राधान्य देत, आरामदायी आणि आत्मविश्वास देणारा पोशाख निवडावा. तर अशाप्रकारे, योग्य तयारी आणि योग्य अटायरमुळे महिलांचा होळीचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.

logo
marathi.freepressjournal.in