लाईफस्टाईल

डार्क अंडरआर्म्सपासून सुटका: घरच्या घरी करा सोपे उपाय

चुकीची हेअर रिमूव्हल पद्धत, सतत घाम येणे, टाइट कपडे, केमिकलयुक्त डिओडरंट्स यामुळे काखेची त्वचा काळी पडू शकते. मात्र काही सोपे घरगुती उपाय नियमित केल्यास काखेतला काळेपणा कमी करता येतो.

किशोरी घायवट-उबाळे

अनेक जणांना काखेत काळेपणाची समस्या भेडसावते. चुकीची हेअर रिमूव्हल पद्धत, सततचा घाम, घट्ट कपडे, केमिकलयुक्त डिओडरंट्स यामुळे काखेची त्वचा काळी पडू शकते. मात्र काही सोपे घरगुती उपाय नियमित केल्यास काखेतला काळेपणा कमी करता येतो.

लिंबू आणि साखर स्क्रब

लिंबाचा रस आणि साखर मिसळून काखेला हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा उजळण्यास मदत होते.

बेकिंग सोडा आणि पाणी

बेकिंग सोडा व पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ती काखेला लावून ५-७ मिनिटांनी धुवा. हा उपाय आठवड्यातून २ वेळा करा.

बटाट्याचा रस

बटाट्यात नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. बटाट्याचा रस काखेला लावून १० मिनिटांनी धुवल्यास काळेपणा हळूहळू कमी होतो.

कोरफड जेल

कोरफड जेल रोज रात्री लावल्यास त्वचा मऊ होते आणि रंग सुधारतो.

हळद आणि दही

हळद आणि दही एकत्र करून पेस्ट तयार करा. ती १० मिनिटे लावून ठेवा व नंतर धुवा. त्वचा उजळण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.

नैसर्गिक उपायांसोबत घ्यावी काळजी

काखेची त्वचा कोरडी ठेवा, टाइट कपडे टाळा आणि अल्कोहोलयुक्त डिओडरंट्सचा वापर कमी करा.

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; CSMT - विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाउन मार्गावर दुरुस्ती

BMC Elections Results 2026 : लढाई संपलेली नाही! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

BMC Elections : शिंदे सेनेचा सावध पवित्रा; नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये; अडीच वर्षे महापौरपदासाठी शिंदेचे दबावतंत्र

अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत

पोलिसांसाठी ४५ हजार घरे बांधणार; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी