कैरीचं लोणचं नाही, यावेळी बनवा आंबट-गोड 'कैरी जाम'; ब्रेड-पोळीसोबत लागेल भन्नाट 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

कैरीचं लोणचं नाही, यावेळी बनवा आंबट-गोड 'कैरी जाम'; ब्रेड-पोळीसोबत लागेल भन्नाट

घरच्या घरी बनवा आंबट-गोड कैरीचा जाम. कमी साहित्यांत तयार होणारी ही सोपी रेसिपी ब्रेड, पोळी किंवा पराठ्यासोबत अप्रतिम लागते. उन्हाळ्यासाठी खास घरगुती पर्याय.

Mayuri Gawade

उन्हाळ्यात कैरीचं पन्हं, लोणचं, चटणी असे पारंपरिक पदार्थ घराघरांत तयार होतात. पण कैरीपासून एक वेगळा आणि चविष्ट पर्यायही बनवता येतो - ‘कैरी जाम’. आंबट-गोड चव, हलकी तिखटसर किनार आणि घरच्या साहित्यांत तयार होणारी ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते.

बाजारातील प्रिझर्व्हेटिव्हयुक्त जामपेक्षा घरचा जाम अधिक ताजा आणि चवीला नैसर्गिक लागतो. सकाळच्या नाश्त्यात ब्रेड, पोळी किंवा पराठ्यासोबत हा जाम दिल्यास वेगळीच चव अनुभवायला मिळते.

कैरी जामसाठी लागणारे साहित्य

  • कैऱ्या - ३ ते ४

  • साखर - १ कप

  • पुदिन्याची पाने - ३ ते ४

  • काळीमिरी - ३ ते ४ दाणे

  • साजूक तूप - १ टेबलस्पून

  • मीठ - चिमूटभर

कसा बनवाल घरचा कैरी जाम?

सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन साल काढा. मग छोटे तुकडे करून बाजूला ठेवा.
मिक्सरमध्ये कैरीचे तुकडे, पुदिना आणि काळीमिरी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. आवश्यक असल्यास थोडंसं पाणी वापरू शकता.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात तयार पेस्ट घाला. मिश्रण हलक्या आचेवर शिजू द्या.
आता त्यात साखर आणि चिमूटभर मीठ घालून सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्याचा रंग आणि टेक्स्चर बदलू लागेल.
जामसारखी घट्ट consistency आली की गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा.

कैरी जाम का ट्राय कराल?

  • घरच्या घरी तयार होणारा नैसर्गिक पर्याय

  • ब्रेड, पोळी, पराठ्यासोबत चविष्ट लागतो

  • मुलांच्या डब्यासाठी वेगळी आयडिया

  • कमी साहित्यांत झटपट तयार

  • प्रिझर्व्हेटिव्हशिवाय ताजा स्वाद

उन्हाळ्यात कैरीचा वापर फक्त लोणचं किंवा पन्ह्यापुरता मर्यादित ठेवू नका. यावेळी आंबट-गोड कैरी जाम करून पाहा. एकदा चव लागली की हा पदार्थ घरात पुन्हा पुन्हा बनवला जाईल.

'४८ तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन'; CJP च्या अभिजीत दिपकेंचा ज्ञानेश कुमार यांना इशारा

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ठाण्यातील क्लस्टर, पुनर्विकासाला गती; १५ वर्षांत ३० लाख घरांचे लक्ष्य, सिद्धेश्वर नगरचे काम तीन वर्षांत पूर्ण करणार

IIT Bombay Student Suicide Case : साहिल वाकोडेचे वडील पोलिसांच्या ताब्यात; उपोषणासाठी IIT बॉम्बेकडे जाताना रोखले