Beauty Tips : घरच्या घरी बनवा नैसर्गिक टोनर; घरगुती साहित्याने वाढवा त्वचेची चमक 'एआय' ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

Beauty Tips : घरच्या घरी बनवा नैसर्गिक टोनर; घरगुती साहित्याने वाढवा त्वचेची चमक

त्वचेसाठी घरच्या घरी बनवता येणारे ५ नैसर्गिक टोनर जाणून घ्या. हे टोनर त्वचेला हायड्रेट करून नैसर्गिक चमक देतात आणि त्वचा निरोगी ठेवतात.

किशोरी घायवट-उबाळे

चमकदार आणि निरोगी त्वचा प्रत्येकाला हवी असते, मात्र ती मिळवण्यासाठी योग्य घटकांची निवड आणि त्यांचा योग्य वापर महत्त्वाचा ठरतो. त्वचेची काळजी घेताना टोनर हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. टोनर त्वचेचा pH संतुलित ठेवतो, आर्द्रता टिकवतो, मॉइश्चरायझरचा परिणाम वाढवतो आणि त्वचेतील लालसरपणा, तेलकटपणा कमी करण्यास मदत करतो.

तज्ज्ञांच्या मते, "टोनर त्वचेला हलकी आर्द्रता देतो, रोमछिद्रांचे (Pores) घट्टपणा वाढवतो आणि त्वचेचा पोत सुधारतो. यामुळे त्वचा अधिक तेजस्वी दिसते. आधुनिक टोनर्समध्ये वनस्पती अर्क, अँटीऑक्सिडंट्स आणि त्वचा संरक्षण करणारे घटक असतात, जे त्वचेला शांत ठेवतात आणि पर्यावरणीय नुकसानापासून बचाव करतात."

घरगुती टोनर वापरताना घ्या काळजी

घरगुती टोनर नैसर्गिक घटकांपासून बनवले जात असल्याने फायदेशीर असतात. मात्र, "नैसर्गिक म्हणजे नेहमी सुरक्षित असे नसते. चुकीचे मिश्रण, अयोग्य प्रमाण किंवा चुकीची साठवणूक केली तर त्याचे त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात," असा इशारा तज्ज्ञ देतात.

घरच्या घरी बनवा ५ नैसर्गिक टोनर

१) गुलाबपाणी आणि कोरफड :

गुलाबपाणी त्वचेला हायड्रेट करते, रोमछिद्र स्वच्छ ठेवते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते. कोरफड त्वचेचा तजेलपणा वाढवते, डाग कमी करते. दोन्ही एकत्र करून वापरल्यास त्वचा उजळ आणि संतुलित राहते.

२) तांदळाचे पाणी
तांदळाचे पाणी त्वचेला पोषण देते, सुरकुत्या कमी करते आणि चमक वाढवते.

३) ग्रीन टी आणि मध
ग्रीन टी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असून त्वचेचे नुकसान कमी करते आणि चमक वाढवते. मध त्वचेला आर्द्रता देतो आणि पुरळ येण्यावर नियंत्रण ठेवतो. थंड ग्रीन टीमध्ये मध मिसळून वापरा.

४) कोरफड आणि काकडी
काकडी त्वचेला थंडावा देते, लालसरपणा कमी करते आणि रोमछिद्र घट्ट करते. दोन चमचे काकडी रस आणि दोन चमचे कोरफड रस एकत्र करून वापरा.

५) तुळस टोनर
तुळस त्वचेतील तेल नियंत्रित करते, ॲक्ने कमी करते आणि त्वचेला स्वच्छ व उजळ ठेवते. तुळशीची पाने उकळून त्याचे पाणी गाळून थंड करून वापरा.

टोनर कसे साठवून ठेवाल?

हे सर्व टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. टोनर ताजे वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी