Freepik Ekaterina Pereslavtseva
लाईफस्टाईल

Washing Machine Cleaning: या टिप्सच्या मदतीने तुमची फ्रंट लोड वॉशिंग मशीन करा स्वच्छ!

Cleaning Hacks: घाणेरड्या मशीनमध्ये कपडे स्वच्छ होत नाहीत आणि त्यांना दुर्गंधी येऊ लागते. जर तुमच्या घरामध्येही फ्रंट लोड वॉशिंग मशिन असेल तर त्याची साफसफाई कशी करावी हे जाणून घ्या.

Tejashree Gaikwad

Automatic Washing Machine Care:आजकाल अगदी प्रत्येकाच्या घरात आपण वॉशिंग मशिन असते. कपडे धुण्यासाठी हे सगळ्यात उपयुक्त मशीन आहे. पण कपडे छान धुणाऱ्या वॉशिंग मशीनमध्येच अनेकदा कपडे घाण होते. याच कारण वॉशिंग मशीनचं घाण होणे. विशेषत: पूर्णपणे ऑटोमॅटिक मशीन वेळोवेळी साफ करणे आवश्यक आहे, अन्यथा ती मशीन लवकर खराब होऊ शकते. वॉशिंग मशिन स्वच्छ न केल्यास त्यात धुण्यासाठी टाकलेल्या कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते. एवढंच नाही तर काही वेळा मशीनमध्ये साचलेली घाण कपड्यांवर चिकटते. याचमुळे मशीन साफ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला बाहेरून कुठलीही सेवा बुक करण्याची गरज नाही. तुम्हाला हवं असल्यास, आपण घरी सहजपणे मशीन साफ ​​करू शकता. फ्रंट लोड ऑटोमॅटिक मशीन कशी स्वच्छ करायची हे जाणून घ्या.

कशी करायची वॉशिंग मशीनची स्वच्छता?

  • सगळ्यात आधी, वॉशिंग मशीन उघडा आणि मशीनच्या दारावरील रबर आतून आणि बाहेरून स्वच्छ करा.

  • मशीनचे रबर स्वच्छ पाणी आणि मऊ स्पंजने स्वच्छ करावे.

  • आता एका मगमध्ये थोड हार्पिक घ्या आणि त्याचा वापर करून रबरच्या आतील बाजू स्वच्छ करा.

  • हे लक्षात ठेवा की हार्पिक फक्त रबरवर लावायचे आहे आणि मशीनच्या बाहेरील बाजूस लावू नका.

  • आता रबरच्या आत आणि बाहेरून पाणी ओतून स्वच्छ करा.

  • बॉटमला असलेले वॉटर फिल्टर काढून मशीनमधून सर्व पाणी काढून टाका.

  • तुम्ही टूथब्रशने फिल्टर आणि बसवलेले पाईप स्वच्छ करून घ्या.

  • आता थोडा गोड सोडा, व्हिनेगर आणि लिक्विड सोप टाकून एक मिश्रण बनवा.

  • हे मिश्रण स्पंजच्या साहाय्याने लावून मशीनचे दरवाजे बाहेरून आणि आतून स्वच्छ करा.

  • आता कापडाच्या साहाय्याने ट्रे स्वच्छ करा.

  • संपूर्ण मशीन बाहेरून कोरड्या कापडाने स्वच्छ करा.

  • यानंतर टब साफ करा. टब साफ करण्यासाठी मशीनची क्लिनिंग पावडर वापरा. याच्या मदतीने वॉशिंग मशीनच्या टबमध्ये साचलेली घाण सहज साफ होईल.

  • अशाप्रकारे तुम्ही वॉशिंग मशिन डीप क्लीनिंग सेवा घरी कोणत्याही त्रासाशिवाय करू शकता.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी