ब्लड प्रेशरची चिंता वाढलीय? आठवड्याभरात फरक जाणवेल; सकाळी प्या 'ही' हेल्दी पेयं 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

ब्लड प्रेशरची चिंता वाढलीय? आठवड्याभरात फरक जाणवेल; सकाळी प्या 'ही' हेल्दी पेयं

कामाचा वाढलेला तणाव, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक दडपण यामुळे आजकाल तरुणांमध्येही उच्च रक्तदाबाची समस्या वाढताना दिसते. ब्लड प्रेशर नियंत्रणात न ठेवल्यास हृदय आणि मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात योग्य पेयाने करणे फायदेशीर ठरू शकते.

Mayuri Gawade

कामाचा वाढलेला तणाव, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक दडपण यामुळे आजकाल तरुणांमध्येही उच्च रक्तदाबाची समस्या वाढताना दिसते. ब्लड प्रेशर नियंत्रणात न ठेवल्यास हृदय आणि मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात योग्य पेयाने करणे फायदेशीर ठरू शकते.

सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी खालील पेयं नियमित घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

१) ग्रीन टी

काळ्या चहाऐवजी ग्रीन टी निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते. यामधील घटक रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

२) जास्वंदीच्या फुलांचा चहा

दुधाच्या चहाऐवजी जास्वंद फुलांपासून बनवलेला हर्बल चहा प्या. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या सैल ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब स्थिर राहण्यास सहाय्य होते.

३)टोमॅटोचा ताजा रस

विटामिन 'सी'ने समृद्ध असलेला टोमॅटोचा रस शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. नियमित सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो.

४) बिटाचा रस

बीटामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात, जे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. नियमित बीटाचा रस घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास सहाय्य होऊ शकते.

५) डाळिंबाचा रस

डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. साखर न घालता बनवलेला डाळिंबाचा रस रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारतो आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो.

लक्षात ठेवा

ही पेयं आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात; मात्र उच्च रक्तदाब असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणाव नियंत्रण हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

(Disclaimer : या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले हे केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची नवशक्ति पुष्टी करत नाही.)

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण