फळं, पानं नाही… बियांमध्ये दडलाय आरोग्याचा खजिना! पपईच्या बिया पचन आणि हृदयासाठी कशा फायदेशीर?

आपण पपई खातो तेव्हा तिचा गोडवा, रंग आणि मऊसर पोत आपल्याला आवडतो. पण पपईच्या मध्यभागी असलेल्या काळ्या छोट्या बिया मात्र आपण सर्रास कचऱ्यात टाकतो. खरं तर ह्याच बियांमध्ये आरोग्याचा छोटासा पण प्रभावी खजिना दडलेला असतो.
फळं, पानं नाही… बियांमध्ये दडलाय आरोग्याचा खजिना! पपईच्या बिया पचन आणि हृदयासाठी कशा फायदेशीर?
फळं, पानं नाही… बियांमध्ये दडलाय आरोग्याचा खजिना! पपईच्या बिया पचन आणि हृदयासाठी कशा फायदेशीर?
Published on

आहारतज्ज्ञ आणि आरोग्य प्रशिक्षक विधी चावला यांनी दि इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, पपईच्या बियांमध्ये फायबर, प्रोटीन आणि निरोगी चरबीचे प्रमाण चांगले असते. त्याचबरोबर झिंक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजेही यात असतात. पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.

१) वजन नियंत्रणासाठी मदत

आजकाल वजन वाढ ही सर्वसामान्य समस्या झाली आहे. पपईच्या बियांमधील फायबर पचनक्रिया सुधारते आणि जास्त वेळ पोट भरल्याची जाणीव देते. त्यामुळे वारंवार खाण्याची सवय कमी होऊ शकते.

२) पचनसंस्थेसाठी फायदेशीर

या बिया आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवतात. त्यामधील नैसर्गिक घटक पचन सुधारण्यास मदत करतात. अपचन, गॅस यांसारख्या किरकोळ त्रासांमध्येही त्या उपयोगी ठरू शकतात.

फळं, पानं नाही… बियांमध्ये दडलाय आरोग्याचा खजिना! पपईच्या बिया पचन आणि हृदयासाठी कशा फायदेशीर?
कांदा आणि लसूण एकत्र ठेवल्याने लवकर कुजतात; 'या' सोप्या स्टोरेज टिप्स वापरा; दीर्घकाळ टिकतील

३) हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी

पपईच्या बियांमधील फायबर वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. त्यात असलेले ओलिक अॅसिड हृदयासाठी लाभदायक मानले जाते.

४) महिलांसाठी विशेष लाभ

काही अभ्यासांनुसार, पपईच्या बियांतील कॅरोटीनॉइड्स हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना किंवा पेटके कमी होण्यास सहाय्य मिळू शकते.

५) नैसर्गिक संरक्षण

या बियांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे अन्नातून होणाऱ्या संसर्गांपासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यातही त्या सहाय्यक ठरतात.

कशा खाव्यात पपईच्या बिया?

  • बिया स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून पूड तयार करा.

  • सॅलेड, दही किंवा स्मूदीमध्ये मिसळा.

  • काहीजण काळी मिरीऐवजी या बियांचा वापर करतात, कारण त्यांना किंचित तिखट चव असते.

दररोज सुमारे एक छोटा चमचा इतकंच प्रमाण पुरेसं मानलं जातं. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटदुखी किंवा इतर त्रास होऊ शकतो, त्यामुळे संयम महत्त्वाचा आहे.

फळं, पानं नाही… बियांमध्ये दडलाय आरोग्याचा खजिना! पपईच्या बिया पचन आणि हृदयासाठी कशा फायदेशीर?
कडधान्य दिन विशेष: हेल्दी समजून मोड आलेली कडधान्यं खाताय? एक चूक झाली तर फायदा नाही, उलट होईल नुकसान

पुढच्या वेळी पपई खाल, तेव्हा तिच्या बिया फेकण्याआधी एकदा नक्की विचार करा. छोट्या दिसणाऱ्या या बिया तुमच्या आरोग्यासाठी मोठा फायदा देऊ शकतात.

(Disclaimer : या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले हे केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची नवशक्ति पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in