Health benefits of milk and honey : दूध आणि मधाचे एकत्र सेवन करा अन् मिळवा हे ७ जबरदस्त फायदे

दुधातील कॅल्शियम, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे तसेच मधातील अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे आणि नैसर्गिक गोडवा एकत्र आल्यावर शरीराला संपूर्ण पोषण मिळते. त्यामुळे केवळ ऊर्जा वाढते असे नाही, तर मानसिक शांतता...
Health benefits of milk and honey : दूध आणि मधाचे एकत्र सेवन करा अन् मिळवा हे ७ जबरदस्त फायदे
Published on

आपल्या स्वयंपाकघरात अनेकदा अशी काही नैसर्गिक देणगी दडलेली असते, जी औषधांपेक्षाही जास्त प्रभावी ठरते. त्यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे दूध आणि मध यांचा संगम. दुधातील कॅल्शियम, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे तसेच मधातील अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे आणि नैसर्गिक गोडवा एकत्र आल्यावर शरीराला संपूर्ण पोषण मिळते. त्यामुळे केवळ ऊर्जा वाढते असे नाही, तर मानसिक शांतता, गाढ झोप, पचन सुधारणा अशा अनेक फायदे अनुभवता येतात.

आयुर्वेदापासून ते आधुनिक संशोधनांपर्यंत सर्वत्र दूध आणि मधाच्या सेवनाचे महत्त्व मान्य केले गेले आहे. त्यामुळे हा संगम आरोग्य टिकवण्यासाठी साधा, पण परिणामकारक उपाय ठरतो.

दूध आणि मधाचे सेवन केल्याने होणारे फायदे पुढील प्रमाणे -

  • रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते
    दुधातील प्रोटीन आणि जीवनसत्त्वे, तसेच मधातील अँटी-ऑक्सिडंट्स यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. छोट्या-मोठ्या आजारांना तोंड देण्याची ताकद शरीराला मिळते.

  • मानसिक शांतता आणि तणावमुक्ती
    झोप न येणे, थकवा किंवा मानसिक ताण अशा त्रासांवर दूध आणि मधाचा संगम उपयुक्त ठरतो. झोपण्याआधी एक ग्लास मधयुक्त दूध घेतल्यास मन शांत होतं आणि गाढ झोप लागते.

  • पचन सुधारते
    अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात. मधातील घटक आतड्यांचे आरोग्य सुधारतात, तर दुधातील पोषकतत्त्वे पचनाला मदत करतात.

  • हाडे मजबूत होतात
    दुधातील कॅल्शियम आणि मधातील खनिजे हाडे बळकट करतात. संधीवाताचा धोका कमी होतो आणि हाडांची झीज थांबते.

Health benefits of milk and honey : दूध आणि मधाचे एकत्र सेवन करा अन् मिळवा हे ७ जबरदस्त फायदे
काय होईल, जर एक महिना साखर खाल्लीच नाही? आताच जाणून घ्या होणारे बदल
  • ऊर्जा आणि ताकद मिळते
    मधाचा नैसर्गिक गोडवा आणि दुधातील प्रोटीन शरीराला त्वरित ऊर्जा देतात. थकवा दूर होतो आणि दिवसभर स्फूर्ती टिकून राहते.

  • मेंदूचे आरोग्य सुधारते
    या पेयामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचारशक्ती वाढण्यास मदत मिळते. विद्यार्थ्यांसाठी तसेच जास्त ताणतणाव असणाऱ्यांसाठी हे विशेष फायदेशीर आहे.

  • पुरुषांसाठी विशेष लाभदायी
    दूध-मधामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे संतुलन राखले जाते. यामुळे शारीरिक ताकद वाढते आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in