Freepik
लाईफस्टाईल

Bhindi Recipe: तुमची भेंडीची भाजी चिकट होते? या ट्रिक्सने होईल क्रिस्पी आणि मोकळी

Tejashree Gaikwad

Cooking Tips and Tricks: अनेकांची आवडीची भाजी म्हणजे भेंडीची भाजी. लहान ते मोठे सगळेच चवीने हे भाजी खातात. पण ही भाजी फारच चिकट होते अशी अनेकांची तक्रार असते. या कारणामुळे अनेकांना त्याची चव आवडत नाही. आभेंडीमधला चिकटपणा दूर करता येतो. चिकटपणा दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला आज एक ट्रिक सांगणार आहोत. ही ट्रिक फॉलो करून भेंडीची भाजी बनवल्यास तुम्ही अगदी कमी तेलात तुम्ही अगदी कुरकुरीत भिंडी बनवू शकता. चला रेसिपी जाणून घेऊयात.

मोकळी भेंडीची भाजी कशी बनवायची?

> सर्व प्रथम, भेंडी धुवा आणि पाणी नीट पुसून घ्या.

> नंतर भेंडीला गोलाकार किंवा लांबट आकारात कापून घ्या.

> जर तुम्ही अर्धा किलो भेंडीची भाजी बनवत असाल तर ५-६ पाकळ्या लसूण आणि १ इंच आले बारीक चिरून घ्या.

> आता २-३ मोठे कांदे चिरून घ्या आणि २-३हिरव्या मिरच्यांचे जाड तुकडे करून घ्या.

> आता कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात अर्धा चमचा ओवा घाला.

> सोबत आले-लसूण आणि हिरवी मिरची घालावी. किंचित तपकिरी झाल्यावर त्यात भाजी आणि कांदा घाला.

> आता भेंडीत मीठ आणि हळद घाला, झाकून ठेवा आणि १५ मिनिटे शिजवा आणि मध्येच परतून घ्या.

> भेंडीची भाजी थोडी शिजली की पॅनमध्ये पसरवा. आणखी ५-७मिनिटे शिजू द्या.

> आता भेंडीमध्ये धने पावडर, तिखट आणि आमचूर पावडर घाला आणि मिक्स करा.

> आता भेंडी हळू हळू शिजू द्या आणि मध्येच परतत रहा.

> भेंडी किंचित कुरकुरीत झाल्यावर गॅस बंद करा. अशा प्रकारे भेंडी अजिबात चिकट होणार नाही.

तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते कमी-अधिक कुरकुरीत बनवू शकता. भेंडी बनवण्यासाठी फक्त एक मोठा रुंद तवा घ्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही भिंडीमध्ये चाट मसाला किंवा मॅगी मसाला देखील घालू शकता. या ट्रिकने बनवलेल्या भेंडीमध्ये कांदा जळणार नाही आणि चवही चांगली येईल.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन