Freepik
लाईफस्टाईल

Cold Coffee Recipe: कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी!

Tejashree Gaikwad

How To Make Cold Coffee At Home: उन्हाळ्यात अनेक प्रकारची पेय बनवली जातात. ही पेय शरीराला थंडावा तर देतातच याशिवाय मूड एकदम रिफ्रेश करतात. जर तुम्ही या कडक उन्हाळी सिजनमध्ये ताजेतवाने करणारे पेय बनवण्याची रेसिपी शोधत असाल तर कोल्ड कॉफीपेक्षा अजून काय चांगले असू शकते. हे केवळ तुम्हाला टेस्ट देत नाही तर रिफ्रेश देखील करू शकते. विशेषत: जर तुम्ही दिवसभर काम करत असाल आणि थकला असाल तर तुम्ही घरी कोल्ड कॉफी नक्कीच तयार करून पहा. खास गोष्ट म्हणजे आम्ही ज्जी रेसिपी सांगत आहोत त्याने तुम्हाला एखाद्या महागड्या कॉफी हाऊसची नक्कीच आठवण येईल. ही कोल्ड कोफी तुम्ही कोणत्याही मशीनशिवाय किंवा ताज्या कॉफी बीन्सशिवाय बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही घरच्या घरी रिफ्रेशिंग कोल्ड कॉफी कशी बनवू शकता.

लागणारे साहित्य

दोन चमचे कॉफी पावडर

अर्धा कप मलाई किंवा पावडर

दोन कप दूध

४ चमचे साखर

एक कप बर्फ

जाणून घ्या कृती

सर्व प्रथम एका पातेल्यात दोन ग्लास थंडगार दूध घ्या.

आता मिक्सरच्या भांड्यात ५ ते ६ चमचे गरम पाणी, साखर आणि कॉफी घालून १ मिनिट चांगले मिसळा.

अशा प्रकारे त्यांच्यामध्ये फोम तयार होण्यास सुरवात होईल.

आता त्यात मलाई घालून परत फेटून घ्या.

साखर, कॉफी आणि मलई नीट मिसळा.

आता दोन ग्लास घ्या आणि अर्ध्याहून अधिक बर्फाने भरा.

आता त्यात मिक्सरच्या जारमधून जाड कॉफीचे बनवलेले मिश्रण टाका.

आता ते थंड दुधात भरा आणि चमच्याने मिसळा.

स्वादिष्ट कोल्ड कॉफी तयार आहे. त्यावर तुम्ही कोको पावडर किंवा कॉफी पावडर शिंपडू शकता.

तुम्हाला हवे असल्यास कॉफी पावडर, साखर, मलई, दूध मिक्सरमध्ये एकत्र करून ३ ते ४ मिनिटे फेटूनही कोल्ड कॉफी बनवू शकता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस