@foodiesfood_court, cookingdiaryathome  Instagram
लाईफस्टाईल

Dahi Bread Toast Recipe: नाश्त्यासाठी बनवा टेस्टी दही ब्रेड टोस्ट, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत!

Tejashree Gaikwad

Testy Breakfast Recipe: नाश्त्यात रोज एकाच प्रकारचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी आपण हटके रेसिपीचा शोध सुरु करतो. अनेकांना नाश्त्यात ब्रेड खायला आवडते. या ब्रेडपासून अनेक वेगवगेळ्या प्रकारचे पदार्थ बनवता येतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी दही ब्रेड टोस्ट ही स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी घेऊन आलो आहोत. रेसिपी कमी वेळात बनवता येते. उन्हाळ्यात ही डिश बेस्ट आहे कारण याचे सेवन केल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहत. याशिवाय हे खाल्ल्याने तुम्ही दिवसभर एनर्जीने भरलेले राहाल. चला तर मग आम्ही तुम्हाला या दही ब्रेड टोस्टची (dahi tadka bread recipe) रेसिपी जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

१ वाटी दही, ब्रेड, चवीनुसार मीठ, तिखट २ चमचे, चिमूटभर हळद, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, कढीपत्ता, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, १ चमचा तेल, १ चिरलेला कांदा, चिरलेला कोथिंबीर

जाणून घ्या कृती

  • सर्व प्रथम एका मोठ्या भांड्यात एक कप दही घेऊन चांगले फेटून घ्या.

  • दही चांगले फेटल्यावर त्यात चवीनुसार मीठ, २ चमचे तिखट, चिमूटभर हळद, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून मिक्स करून घ्या.

  • आता गॅसवर फोडणीचा पॅन घेऊन त्याला व्यवस्थित गरम करा आणि त्यात १ चमचा तेल घाला. या तेलात कढीपत्ता, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घाला.

  • आता ही तयार फोडणी दह्यामध्ये घालून चांगले मिसळा.

  • दह्यात चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला.

  • आता या तयार दह्याच्या मिश्रणात ब्रेड बुडवा.

  • गॅस चालू करून त्यावर तवा ठेवा आणि बटर घाला.

  • आता त्या तव्यावर दह्यात बुडवलेला ब्रेड ठेवा. ब्रेड दोन्ही बाजूंनी नीट शिजवून घ्या.

  • अशाप्रकारे तुमचा दही ब्रेड तयार आहे.

  • आता दही ब्रेड एका प्लेटमध्ये ठेवा आणि ब्रेडवर कांदा आणि हिरवी कोथिंबीर घाला आणि आता सॉस बरोबर सर्व्ह करा.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त