लाईफस्टाईल

Face Pack: निस्तेज त्वचा झालीये? वापरा बेसन-हळद फेस पॅक, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Glowing Skin: चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही बेसन आणि हळद यांचा फेस पॅक बनवून लावू शकता. हा फेस पॅक कसा बनवायचा आणि त्यामुळे त्वचेला काय फायदे होतात हे जाणून घेऊयात.

Tejashree Gaikwad

Skin Care: जर तुमची त्वचा निस्तेज झाली असेल आणि अगदीच निर्जीव वाटत असेल तर तुम्हाला त्यावर उपाय करण्याची गरज आहे. चेहऱ्यावर अनेक प्रकारचे डागही असतील तरी ते तुम्ही घरीच काढून टाकू शकता. यासाठी तुम्ही बेसन आणि हळदीचा वापर करू शकता. बेसन हा एक असा घटक आहे जो त्वचेला झटपट चमक देतो आणि डाग देखील दूर करतो. बेसनामध्ये दही, मध आणि हळद यांचा वापर करून अजून छान रिझल्ट्स तुम्ही मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया बेसन, दही आणि हळद याचा फेस पॅक कसा बनवायचा.

लागणारे साहित्य

२ टीस्पून बेसन, १ टीस्पून हळद, १ टीस्पून दही किंवा गुलाब पाणी, १ टीस्पून मध

कसा बनवायचा फेस पॅक?

एका छोट्या बाउलमध्ये भांड्यात बेसन आणि हळद मिक्स करा. त्यानंतर त्यात दही किंवा गुलाबपाणी टाकून चांगले मिसळा. यात तुम्ही मधही घालू शकता. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे राहू द्या. ठरलेल्या वेळेनंतर, आपला चेहरा थंड पाण्याने धुवा आणि कोरड्या टॉवेलने कोरडा करा.

किती वेळा वापरू शकता हा फेस पॅक?

तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून एक किंवा दोनदा वापरू शकता. ये पेक्षा जास्तवेळा हा फेस पॅक वापरू नकात.

काय फायदे होतात?

बेसन-हळदीचा फेस पॅक चेहऱ्यावरील निस्तेज त्वचा आणि डाग काढून टाकण्यास मदत करतो. आपल्या त्वचेवरची डेड स्किन काढून टाकायला मदत करते. याशिवाय हा फेस पॅक त्वचेला चमकदार बनवून टॅन काढून टाकते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले