लाईफस्टाईल

Makhana Chaat Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवा मसालेदार मखाना दही चाट, जाणून घ्या रेसिपी!

Tejashree Gaikwad

How To Make Makhana Chaat: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत काही तरी खावंसं वाटतं. अशावेळी अनहेल्दी पदार्थ खावेसे वाटत नाही. निरोगी राहण्यासाठी हेल्दी पर्यायांचा शोध घेतला जातो. बाहेरचे तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करणे कधीही चांगले. मात्र, आरोग्यासोबतच टेस्टही हवी असते. संध्याकाळी चहासोबत (tea time snacks recipe) काहीतरी चटपटीत खावेसे वाटत असेल तर तुम्ही मखाना चाट बनवू शकता. मखाना चाट चवीला खूप चविष्ट आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. मखाना चाट कसा बनवायचा हे माहित आहे? नसेल माहिती तर आम्ही दिलेली रेसिपी ट्राय करून बघा.

लागणारे साहित्य

  • २ कप मखाना

  • १ चमचा देशी तूप

  • हिरव्या कोथिंबीरीची चटणी

  • १ कांदा बारीक चिरून

  • १ टोमॅटो बारीक चिरून

  • उकडलेले स्वीट कॉर्न

  • गोड आणि आंबट चटणी

  • दही २ चमचे

  • अर्धा चमचा साखर

  • चवीनुसार मीठ

  • मसाला

  • मिरची पावडर

  • अर्धा कप शेव नमकीन

  • कोथिंबीर

  • डाळिंब बिया

जाणून घ्या कृती

  • सगळ्यातआधी कढईत तूप घालून मंद आचेवर मखाना परतून घ्या.

  • मखाना भाजून झाल्यावर गॅस बंद करून थंड होऊ द्या. तोपर्यंत हिरवी चटणी करावी.

  • कोथिंबीर, पुदिना, लसूण, मीठ, लिंबू आणि हिरवी मिरची यांची जाड चटणी तयार करा.

  • मखाना एका भांड्यात काढा आणि त्यात साखर आणि दही मिसळा.

  • आता मखान्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि उकडलेले कॉर्न चांगले मिसळा.

  • आता मीठ, तिखट, चाट मसाला असे सर्व मसाले चांगले मिसळा.

  • आता तयार केलेली हिरवी चटणी आणि खारट शेव मखान्यात घालून मिक्स करा.

  • सर्व साहित्य मिक्स करून डाळिंबाचे दाणे आणि हिरवी कोथिंबीर घालून सजवा.

  • स्वादिष्ट मखाना चाट तयार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त