Monsoon Recipe: पावसाळ्यात वातावरण आल्हाददायक होताच काही तरी क्रिस्पी आणि टेस्टी खावेसे वाटते. पावसाळ्यात चहा पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि गरमागरम चहाबरोबरच काही चटपटीत आणि कुरकुरीत खायला मिळालं तर अजून आनंद होतो. अशा दिवसात तळलेले पदार्थ खावेसे वाटते. जर तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसात एक कप चहासोबत उत्तम कॉम्बिनेशन शोधत असाल, तर या पावसाळ्यात तुम्ही मूग डाळ नगेट्स ट्राय (How to Make Moong Dal Nuggets) करून पाहू शकता. हे बनवण्याची पद्धत सोपी आहे. चला स्वादिष्ट मूगदार नगेट्स कसे बनवायचे ते जाणून घ्या.
लागणारे साहित्य
१/२ कप पिवळी मूग डाळ
१/२ कप हिरवी मूग डाळ
१/२ बारीक चिरलेला कांदा
२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१/४ कप बारीक चिरलेली गाजर
६-७ कढीपत्ता
१ कप ब्रेडचे तुकडे
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून काळी मिरी
१/२ टीस्पून चाट मसाला
१/२ टीस्पून जिरे
२ चमचे कॉर्नफ्लोर
२ चमचे तेल
चवीनुसार मीठ
जाणून घ्या कृती
दोन्ही डाळी एकत्र करून धुवून २ ते ३ तास भिजवून ठेवाव्यात.
यानंतर एका पातेल्यात पाणी टाकून दाली अर्धी शिजेपर्यंत शिजवा.
डाळी थंड करून २ चमचे काढून ठेवा आणि उरलेल्या डाळी मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.
आता एका बाऊलमध्ये वाटलेली डाळ काढून त्यात बारीक चिरलेल्या भाज्या, मसाले, ब्रेडचा चुरा आणि कॉर्नफ्लोअर घालून पीठ मळून घ्या.
नंतर या तयार मिश्रणापासून लहान गोळे बनवा आणि एअर फ्रायर १८०अंशांवर प्री-हीट करा.
आता सर्व नगेट्स एका एअर फ्रायरमध्ये ठेवा आणि त्यावर तेल लावा आणि १५ मिनिटे किंवा कुरकुरीत सोनेरी होईपर्यंत बेक करा.
एअर फ्रायर नसल्यास तुम्ही कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तेलात तळू शकता.