binjalsvegkitchen.com /Pinterest
लाईफस्टाईल

Pani Puri: पाणीपुरीचा नेहमीचा फ्लेवर खाऊन कंटाळा आलाय? बनवा 'हे' वेगवेगळे फ्लेवर्स

Tejashree Gaikwad
चाट लव्हर्ससाठी पाणीपुरी हा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे. पाणीपुरीचा नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण नेहमीच सेम फ्लेवर खाऊन कंटाळा येतो. याचसाठी आम्ही तुम्हाला घरच्या घरी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पाणीपुरीचे पाणी कसे बनवायचे ते सांगणार आहोत.
आमचूर पावडरचे पाणी: आमचूर अर्थात कैरीची पावडर. ही पावडर सहज बाजारात उपलब्ध होते. याचे पाणी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात ३ ग्लास पाणी घ्या. या पाण्यात अडीच चमचे आमचूर पावडरआणि २ चमचे साखर घाला. १ चमचा भाजलेले जिरे पावडर, चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर हिंग आणि मीठ घालून छान मिक्स करून घ्या.
जलजिऱ्याचे पाणी : हे पाणी बनवण्यासाठी एका भांड्यात ३ ग्लास पाणी घेऊन त्यात १ जलजीरा, ३ चमचे साखर पावडर, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ टाका. तुमचे पाणी तयार आहे.
लसूण पाणी: नाव वाचून वाटेल की हा फ्लेवर कसा लागेल पण हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वाधिक ३-४ पाकळ्या किसून घ्या आणि एका मोठ्या भांड्यात ३ ग्लास पाणी घ्या आणि त्यात किसलेल्या लसणाच्या पाकळ्या,१ चमचे काळे मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घाला चांगले मिसळा.
चिंचेचे पाणी: पाणीपुरीच्या पाण्यासाठी चिंचेचे पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. हे बनवण्यासाठी अर्धी वाटी चिंच १ तास भिजत ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर एका मोठ्या भांड्यात ३ ग्लास पाणी घेऊन त्यात चिंचेचा कोळ काढून त्यात १ चमचा चाट मसाला, अर्धा चमचा भाजलेले जिरे आणि चवीनुसार मीठ टाका.
कोथिंबीर-पुदिन्याचे पाणी: धणे-पुदिन्याचे पाणी बनवण्यासाठी हिरवी धणे आणि पुदिना समान प्रमाणात घ्या. एका मोठ्या भांड्यात तीन ग्लास पाणी घेऊन त्यात २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा काळे मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर आणि पुदिना बारीक करून मिश्रण टाका. आता हे सर्व मिश्रण चांगले मिसळा. कोथिंबीर-पुदिन्याचे पाणी तयार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त