Freepik
लाईफस्टाईल

Poha Uttapam Recipe: पोह्यापासून झटपट बनवा उत्तपम, नोट करा रेसिपी

Tejashree Gaikwad

How to Make Uttapam: जर तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात काही हेल्दी आणि चविष्ट खावंसं वाटत असेल तर साऊथ इंडियन पदार्थ हा उत्तम पर्याय आहे. पण नेहमीचाच चवीचा उत्तपम खाऊन कंटाळा येतो. मग अशावेळी वेगळ्या रेसिपीचा शोध घेतला जातो. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही पोह्यातून उत्तपम बनवू शकता. ज्या पोहेपासून तुम्ही पोहे बनवता तेच पोहे उत्तपम बनवण्यासाठीही योग्य आहेत. पोह्यांपासून झटपट उत्तपम तयार करता येते. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता. विशेष म्हणजे अशा प्रकारे उत्तपम बनवण्यासाठी तुम्हाला डाळ किंवा तांदूळ भिजवण्याची गरज नाही. चला जाणून घेऊयात पोह्यापासून उत्तपम बनवण्याची सोपी रेसिपी...

लागणारे साहित्य

साधारण अर्धा कप जाड पोहे, अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी दही, मीठ, बारीक चिरलेल्या भाज्या जसे की कांदा, सोयाबीन, गाजर, सिमला मिरची आणि कोथिंबीर

जाणून घ्या रेसिपी

  • सगळ्यात आधी एका भांड्यात पोहे पाण्यात ५ मिनिटे भिजत ठेवा. या पोह्यातील पाणी काढून त्याची पेस्ट बनवा.

  • या पेस्टमध्ये रवा, पाणी, दही आणि मीठ घाला आणि छान मिक्स करून घ्या.

  • तयार केलेले मिश्रण साधारणपणे २० मिनिटे तसेच ठेवा. जेणेकरून सर्व गोष्टी नीट मिक्स होऊन पीठ छान फुगते.

  • यानंतर उत्तपमसाठी सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. चवीनुसार भाज्यांमध्ये मीठ आणि चिली फ्लेक्स घाला.

  • आता तव्यावर तूप लावून गरम करून घ्या. गरम झालेल्या पिठावर तयार केलेलं पीठ पसरून घ्या.

  • त्या पिठावर वरच्या बाजूला भाज्या टाका, थोडा दाबा आणि नंतर झाकून शिजवा.

  • उत्तपमच्या काठावर हलके तेल लावा आणि खालून शिजल्यावर ते उलटा.

  • उत्तपम दुसऱ्या बाजूनेही नीट शिजवून घ्या. जेणेकरून भाज्या मऊ होतील.

  • दोन्ही बाजूंनी शिजल्यानंतर, उत्तपम प्लेटमध्ये काढून नारळाच्या चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत