freepik
लाईफस्टाईल

Potato Chilla: नाश्त्यात बनवा टेस्टी बटाट्याचा चीला, जाणून घ्या झटपट होणारी रेसिपी

Tejashree Gaikwad

Healthy Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काही हेल्दी खायचं असेल तर चीला हा एक उत्तम पर्याय आहे. रेगुलर चीला हा बेसन, रवा, मूग डाळीपासून तयार होतो. पण तुम्ही कधी बटाट्यापासून चीला बनवला आहे का? हो बटाट्यापासूनही तुम्ही चविष्ट चीला बनवू शकता. हा हेल्दी आणि टेस्टी चीला सकाळच्या घाईच्या वेळेत बनवण्यासाठी बेस्ट आहे कारण हा पदार्थ झटपट तयार होतो. बटाट्याचा चीला मुलांना डब्यातही देता येतो. चला बटाटा चिल्याची हटके रेसिपी जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

१ मोठा बटाटा, २ चमचे बेसन, १ चमचा रवा, १ चमचा कॉर्नफ्लोर पावडर, १ चमचा बारीक चिरलेला कांदा, १ चिरलेली हिरवी मिरची, थोडी जिरेपूड, धनेपूड आणि लाल मिरची, चवीनुसार मीठ, तेल

जाणून घ्या कृती

  • सर्वप्रथम बटाटा सोलून आणि छान किसून घ्या.

  • बटाट्याचा रंग काळा होऊ नये यासाठी बटाट्याच्या किसला पाण्यात ठेवा. काही वेळानंतर पाण्यातून काढून पिळून घ्या.

  • एका भांड्यात किसलेला बटाटा, बेसन, रवा, कॉर्नफ्लोअर पावडर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडी जिरेपूड, धनेपूड आणि लाल मिरची, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

  • सर्व गोष्टी नीट मिक्स करा आणि चांगले मिश्रण तयार करा.

  • आता एक तवा घ्या आणि गरम होऊ द्या. या तव्यावर नंतर व्यवस्थित तेल परसवून घ्या.

  • तव्यावर तयार केलेलं मिश्रण घाला. मिश्रणावर झाकून ठेवा आणि थोडा वेळ शिजवा.

  • २ मिनिटे मंद आचेवर शिजल्यानंतर थोडे तेल लावून दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

  • कुरकुरीत बटाट्याचा चीला तयार आहे. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

  • बटाट्याचा चिला हा नाश्ता किंवा स्नॅक्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठीही चीला एक चांगला पर्याय आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस