Freepik
लाईफस्टाईल

Tomato Soup Recipe: पावसाळ्यात नाश्त्यासाठी बनवा टेस्टी टोमॅटो सूप, जाणून घ्या पद्धत

Breakfast Recipe: पावसाळ्यातील थंडगार वातावरणात सूप पिण्याचा आनंद वेगळाच असतो. यासाठीच आम्ही आज तुम्हाला टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

Tejashree Gaikwad

Monsoon Recipe: पावसाळ्यात आरोग्य राखणे गरजेचे आहे. कारण अनेक संसर्गजन्य रोग पावसाळ्यात होतात. अशावेळी उत्तम नाश्ता करणे गरजेचे आहे. हेल्दी नाश्ता म्हणून तुम्ही सूप खाऊ शकता. डाळी आणि भाज्यांचे सूप नेहमीच बनवले जाते. पण तूम्ही पावसाळ्यात टोमॅटो सूप आवर्जून प्यायला हवे. टोमॅटो सूप हे फक्त स्वादिष्टच नाही तर बनवायलाही खूप सोपे आहे. पावसाळ्यातील थंडगार वातावरणात सूप पिण्याचा आनंद वेगळाच असतो. यासाठीच आम्ही आज तुम्हाला टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या सोप्या रेसिपीला फॉलो करून तुम्ही घरच्या घरी स्वादिष्ट टोमॅटो सूप तयार करू शकता. चला रेसिपी जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य (Ingredients for Tomato Soup)

  • २ टेबलस्पून बटर किंवा ऑलिव्ह ऑईल

  • १ कांदा चिरलेला

  • ३-४ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या

  • २ कप ताजे टोमॅटो

  • अर्धा टीस्पून लाल तिखट

  • अर्धा टीस्पून गरम मसाला

  • ५ ते ६ काजू

  • १ कप क्रीम

  • मीठ

  • मरपूड चव

जाणून घ्या कृती ( recipe for tomato soup)

  • गॅस चालू करून त्यावर एक मोठा पॅन ठेवा. गरम झाल्यावर त्यात बटर घाला.

  • आता तमालपत्र, कांदा आणि लसूण घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घाला.

  • टोमॅटो थोडे शिजल्यावर त्यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, ५ ते ६ काजू आणि चवीनुसार मीठ घाला. टोमॅटो नीट शिजले की गॅस बंद करा.

  • हे बनवलेले मिश्रण थंड होऊ द्या. त्यातून तमालपत्र काढा आणि या मिश्रणात १ ग्लास पाणी घालून गुळगुळीत पेस्ट मिक्सरमध्ये बनवून घ्या.

  • आता पुन्हा एकदा गॅस चालू करा, पॅन घ्या आणि त्यात मिक्सरमध्ये बनवलेली टोमॅटो पेस्ट घाला.

  • त्यात बटरचा तुकडा आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घाला.

  • आता गॅस बंद करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दूध किंवा मलई घालून हे सूप आणखी स्वादिष्ट बनवू शकता.

भाजप-एमआयएम सत्तेसाठी एकत्र; अचलपूर नगरपरिषदेत युती

गुटखा बंदीसाठी स्वतंत्र कायदा; गुजरातच्या दारूबंदीच्या धर्तीवर अंमलबजावणी; मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

वर्षात ५ वेळा नियम मोडल्यास वाहन परवाना निलंबित; परिवहन मंत्रालयाचा नवीन नियम लागू

प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवल्याने १०६ बांधकामांना ‘स्टॉप वर्क नोटीस’; रेल्वे पूल बांधकाम, एसआरए, म्हाडा प्रकल्पांचा समावेश

१ लाखाचे औषध २८ हजारांना मिळणार; कर्करोग रुग्णांसाठी भारतात स्वस्त औषध तयार