Freepik
लाईफस्टाईल

Paneer Adulteration: तुम्ही खाताय ते पनीर खरं की खोटं? जाणून घ्या बनावट पनीर ओळखण्याच्या टिप्स

Tejashree Gaikwad

How to test fake paneer at home: शाकाहारी आहार घेणाऱ्यांसाठी पनीर हा सर्वात पौष्टिक खाद्यपदार्थ म्हणून ओळखला जातो. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि बरेच काही असते पोषक तत्व असतात. पनीर हे आरोग्याच्या दैनंदिन गरज पूर्ण करण्यास मदत करते. पण दुकानातून विकत घेतलेले पनीर हे बनावट आणि भेसळयुक्त निघाले तर काय करणार? होय आजकाल पनीरमधेही भेसळ होत आहे. गेल्या काही वर्षात अनेक बनावट पनीरच्या घटनाही समोर आल्या आहेत. तुम्ही खात असलेलं पनीर कदाचित सिंथेटिक पनीर असू शकतं. मग अशावेळी खरं पनीर कसं ओळखायचं ते जाणून घेणे गरजेचे आहे.

या टिप्स फॉलो करा

  • पनीर नैसर्गिक की बनावटी हे तपासण्यासाठी तुम्ही आयोडीन टिंचर वापरू शकता. पॅनमध्ये पाणी घ्या आणि त्यात पनीर घालून उकळवा. नंतर ते थंड होऊ द्या आणि त्यावर आयोडीन टिंचरचे काही थेंब घाला. जर पनीरचा रंग निळा झाला तर समजा की हे बनावटी पनीर आहे.

  • पनीर खरेदी करण्यापूर्वी नेहमी एक छोटासा तुकडा खाऊन बघा. जर पनीरची चव खूप आंबट असेल तर पनीरमध्ये डिटर्जंट किंवा इतर काही निकृष्ट उत्पादनाची भेसळ असल्याची शक्यता असते.

  • पनीर पाण्यात उकळा, थंड होऊ द्या आणि नंतर त्यात सोयाबीन पावडर घाला. जर पनीरचा रंग हलका लाल झाला तर याचा अर्थ चीज डिटर्जंट किंवा युरियाने बनवले आहे.

  • पनीर थोड्या पाण्यात उकळा आणि ते थंड झाल्यावर त्यात थोडी तूर डाळ पावडर घाला आणि १० मिनिटे राहू द्यात. जर पनीरचा रंग हलका लाल झाला तर हे पनीर डिटर्जंट किंवा युरियाने बनवलेले असू शकते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त