तुम्हीही रेल्वेने प्रवास करताय? मग 'हे' नवे नियम आधीच जाणून घ्या; सर्व प्रवाशांसाठी अनिवार्य! 
लाईफस्टाईल

तुम्हीही रेल्वेने प्रवास करताय? मग 'हे' नवे नियम आधीच जाणून घ्या; सर्व प्रवाशांसाठी अनिवार्य!

भारतीय रेल्वेमधून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करत असतात. अशातच, गर्दीच्या काळात नियमांचे पालन केले नाही तर, गंभीर समस्या उद्धवू शकतात. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबर २०२५ मध्ये महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. तिकीट बुकिंगपासून सामान मर्यादा, धूम्रपान बंदी ते परतावा नियम - प्रवाशांनी कोणते नियम पाळायला हवेत, पाहूया सविस्तर...

Mayuri Gawade

भारतीय रेल्वेमधून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करत असतात. अशातच, गर्दीच्या काळात नियमांचे पालन केले नाही तर, गंभीर समस्या उद्धवू शकतात. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबर २०२५ मध्ये महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. तिकीट बुकिंगपासून सामान मर्यादा, धूम्रपान बंदी ते परतावा नियम - प्रवाशांनी कोणते नियम पाळायला हवेत, पाहूया सविस्तर.

१) आधार-लिंक्ड तत्काळ तिकीट बुकिंग अनिवार्य

तत्काळ (Tatkal) तिकिटे बुक करण्यासाठी आयआरसीटीसीवरील खाते आधारशी लिंक असणे बंधनकारक.

  • ओटीपी आधारित आधार प्रमाणीकरण आवश्यक

  • खाते सत्यापित नसल्यास तत्काळ बुकिंगचा पर्याय उघडत नाही

२) एजंटना ३० मिनिटे बुकिंग बंद

सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळावीत म्हणून एजंटवर निर्बंध:

  • एसी वर्गासाठी एजंट बुकिंग १०:३० नंतर

  • नॉन-एसी वर्गासाठी ११:३० नंतर

  • आयआरसीटीसीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर नियम समान

३) वैध तिकीट नसल्यास दंड

प्रत्येक प्रवाशाकडे ट्रेनमध्ये चढताना वैध तिकीट असणे आवश्यक.

  • काउंटर तिकीट / ऑनलाइन तिकीट / अधिकृत पास - कोणतंही चालेल

  • तिकीट नसल्यास दंड किंवा ट्रेनमधून उतरवणे

  • गर्दीच्या मार्गावर तिकीट तपासणी अनेकदा होऊ शकते

४) वर्गनिहाय सामान मर्यादा

भारतीय रेल्वेची बॅगेज मर्यादा पुढीलप्रमाणे:

  • फर्स्ट एसी - ७० किलो

  • सेकंड एसी - ५० किलो

  • थर्ड एसी / स्लीपर - ४० किलो

  • जनरल - ३० किलो

मर्यादेपेक्षा जास्त सामान लगेज कोचमध्ये वेगळे बुक करावे लागते.

५) रेल्वे परिसरात धूम्रपान करण्यास मनाई

ट्रेनमध्ये, प्लॅटफॉर्मवर किंवा कोणत्याही रेल्वे मालमत्तेत धूम्रपान पूर्णतः प्रतिबंधित आहे. उल्लंघन केल्यास दंड भरावा लागू शकतो.

६) अन्नपदार्थाबाबत नियम

  • प्रवाशांना घरचे जेवण नेण्यास मुभा

  • अधिकृत पॅन्ट्री कार व अधिकृत विक्रेतेच मान्य

  • अनधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी टाळण्याचा सल्ला

७) ट्रेनमध्ये मद्यपानाला मनाई

रेल्वे स्थानक परिसरात आणि ट्रेनमध्ये मद्यपान बंद.

आरपीएफ किंवा ऑनबोर्ड स्टाफ उल्लंघनावर कारवाई करू शकतो.

८) तिकीट रद्दीकरण आणि परतावा (Ticket cancellation and refund)

  • परतावा रद्दीकरणाच्या वेळेवर अवलंबून

  • ट्रेन सुटण्यापूर्वीच रद्दीकरण प्रक्रिया आवश्यक

  • सुटण्याआधी उशिरा रद्द केल्यास कपात जास्त

९) प्रवासादरम्यान सुरक्षेच्या सूचना

रेल्वेचे नियमित सल्ले:

  • मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा

  • दाराजवळ गर्दी करू नका

  • चढताना–उतरताना सतर्कता

  • चालत्या ट्रेनमध्ये चढू / उतरू नका

प्रशासनाच्या मते, या सूचनांचे पालन केल्यास समस्यांचे प्रमाण कमी होऊ शकेल.

महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल; राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती

निवडणुका होणारच, पण...; सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय

२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...

Mumbai : बांधकाम प्रदूषणावर हायकोर्टाची कठोर भूमिका; नियमांच्या अंमलबजावणीसाठी नेमली ५ सदस्यांची समिती

"सीझन २ - पुन्हा मुलगी!" मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; सोशल मीडियावर खास पोस्टसोबत दिली गुड न्यूज