Freepik
लाईफस्टाईल

International Day of Yoga: एक आसन...चटकन पाठदुखी होईल गायब; पाय दुखण्यापासूनही मिळेल आराम

Salabhasana Benefits: अनेकांना आजकाल पायांमध्ये तीव्र वेदना आणि सुन्नपणा जाणवतो. यासाठी कोणतेही औषध घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी योगासन करून अराम मिळवू शकता.

Tejashree Gaikwad

Back and Leg Pain: शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्व अवयवांची योग्य पद्धतीने हालचाल होणे गरजेचे आहे. शरीरात थोडीशीही समस्या असल्यास सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. याच कारणाने प्रत्येकाने नियमित शाररिक हालचाल करणे आवश्यक आहे. यासाठी योगासने करणे कधीही उत्तम ठरते. योगामुळे केवळ मानसिक आणि शारीरिक दोन्ही समस्या दूर होण्यास मदत होत नाही तर स्नायूंवरील ताण कमी होण्यासही मदत होते. तुम्हाला सतत पाठदुखी, थकवा आणि वाढत्या वजनामुळे त्रास होत असेल तर शलभासन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला आज आपण शलभासन कसे करायचे हे जाणून घेऊयात.

कसं करायचं आसन?

  • प्रथम पोटावर झोपा.

  • आपले शरीर सरळ ठेवा.

  • आता आपले हात शरीराच्या बाजूने सरळ ठेवा.

  • हळू श्वास घ्या आणि आपले लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा.

  • पोटाला सपाट ठेवा.

  • आता श्वास घेताना, तुमचे पोटाचे स्नायू उचला आणि तुमचे पाय हळू हळू वर करा.

  • पोट आणि मांडीवर जास्त दाब पडणार नाही याकडे लक्ष द्या.

  • श्वास सोडत, हळू हळू तुमचे पाय मध्यम उंचीवर उचला आणि नंतर हळू हळू तुमचे पाय खाली आणा.

काय फायदे मिळतात?

> पाठदुखीपासून आराम

हे योगासन पाठीच्या खालच्या दुखण्यापासून आराम देते.

> स्नायूंचा आकार योग्य ठेवते

हे आसन हिप आणि त्याच्या सभोवतालच्या स्नायूंना योग्य आकारात ठेवते.

> वजन नियंत्रित ठेवते

हे आसन नियमित केल्याने चरबी बर्न होते आणि वजन कमी होते.

> पचन सुधारते

हे आसन पोटासाठी फायदेशीर असून पचनक्रिया सुधारते.

> थकवा दूर होणे

या आसनामुळे मानसिक तणाव तसेच थकवा दूर होण्यास मदत होते.

कोणी करू नये हे आसन?

गरोदर महिला, पेप्टिक अल्सर, हर्निया, हाय बीपी आणि हृदयाच्या रुग्णांनी हे आसन करू नये. जर तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होत असतील तर हे आसन काळजीपूर्वक करा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही; फडणवीस यांचे वक्तव्य

परतीचे दोर कापलेत; भाजपशी संधान बांधणाऱ्यांना शरद पवार यांचा सूचक इशारा

दोन वर्षांत पदवीधर शक्य; विद्यापीठ अनुदान आयोगाचे धोरण तयार

अल्पवयीन पत्नीशी सहमतीचे शरीरसंबंध हाही बलात्कारच;नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

आता विवाहासाठीही मिळणार कर्ज; मॅट्रीमोनी डॉटकॉमची ऑफर