Devbhumi Uttarakhand IRCTC Tour Package+ Freepik
लाईफस्टाईल

Uttarakhand: देवभूमी उत्तराखंडचं सौंदर्य बघायला जायचं आहे? जाणून घ्या IRCTC च्या बजेट फ्रेंडली पॅकेजची माहिती

IRCTC Tour Package: तुम्ही अजून उत्तराखंडचे सौंदर्य एक्सप्लोर केले नसेल, तर IRCTCच्या कमी बजेट तूर पॅकेजची ही एक सुवर्ण संधी सोडू नकात.

Tejashree Gaikwad

IRCTC Uttarakhand Tour Package: उत्तराखंड हे निसर्गसौंदर्य आणि खूप धार्मिक स्थळे असलेले एक अद्भुत ठिकाण आहे. तुम्ही निसर्ग प्रेमी असाल किंवा अ‍ॅडव्हेंचर प्रेमी असाल, उत्तराखंडमध्ये प्रत्येक प्रकारच्या ट्रॅव्हलप्रेमीसाठी पर्याय आहेत. जर तुम्ही आत्तापर्यंत उत्तराखंड फक्त व्हिडीओ, फोटोमधील पाहिले असेल, तर आता या सुंदर ठिकाणाला भेट देण्याची वेळ आली आहे. आयआरसीटीसी तुम्हाला ते जवळून पाहण्याची संधी देत ​​आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही उत्तराखंडमधील अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. पॅकेजशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.

महत्त्वाचे तपशील

हे टूर पॅकेज १० रात्र आणि ११ दिवसांसाठीचे आहे. यामध्ये तुम्ही ट्रेनने प्रवास करणार आहात. अल्मोरा, बैजनाथ, भीमताल, कौसानी, नैनिताल, रानीखेत ही ठिकाणं या ट्रिपमध्ये कव्हर केली जाणार आहेत. ही ट्रिप १२/०७/२०२४ रोजी सुरु होईल.

काय सुविधा मिळणार?

  • राहण्यासाठी हॉटेलची सोय असेल.

  • नाश्ता आणि रात्रीचे जेवण पॅकेजमध्ये उपलब्ध असेल.

  • तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील मिळेल.

किती पैसे मोजावे लागणार?

  • यामध्ये तुम्ही स्टँडर्ड पॅकेज घेतल्यास तुम्हाला २८,०२० रुपये द्यावे लागतील.

  • डिलक्स पॅकेजसाठी प्रति व्यक्ती ३५,३४० रुपये शुल्क भरावे लागेल.

  • लक्षात घ्या तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल.

कसे करायचे बुकिंग?

तुम्ही या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही आयआरसीटीसी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास