प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
लाईफस्टाईल

उन्हाळा आहे, घरातून बाहेर निघताना 'या' गोष्टी बॅगेत असायलाच हव्या

घराबाहेर निघताना आपण तसे पाहिले तर नेहमीच तयारी करून निघतो. आवश्यक सामान बॅगेत हमखास ठेवतो. मात्र, सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्या बॅगेत असणे हे अतिशय महत्त्वाचे असते. जाणून घ्या घराबाहेर पडण्यापूर्वी कोणत्या वस्तू आठवणीने बॅगेत ठेवायला हव्यात.

Kkhushi Niramish

घराबाहेर निघताना आपण तसे पाहिले तर नेहमीच तयारी करून निघतो. आवश्यक सामान बॅगेत हमखास ठेवतो. मात्र, सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्या बॅगेत असणे हे अतिशय महत्त्वाचे असते. जाणून घ्या घराबाहेर पडण्यापूर्वी कोणत्या वस्तू आठवणीने बॅगेत ठेवायला हव्यात.

वेट टिश्यू (wet tissue)

उन्हाळ्यामुळे सातत्याने घाम येत असतो. त्यामुळे चेहरा डळमळीत होतो. सोबतच स्कीनही जळजळ करते. यातून तातडीने आराम देणारी गोष्ट म्हणजे वेट टिश्यू. हे वेट टिश्यू कोणत्याही मेडिकलमध्ये अगदी सहजासहजी उपलब्ध होते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला उष्णतेमुळे त्रास होत असेल तर चेहरा वेट टिश्यूने स्वच्छ केल्यास एकदम क्लिन होतो. सोबतच याच्या वेगवेगळ्या फ्लेवरमुळे फ्रेशही वाटते.

पिण्याच्या पाण्याची छोटी बाटली

आपल्याकडे एक छोटी बाटली पिण्याच्या पाण्याची कायम आपल्या बॅगमध्ये असू द्यावी. यामुळे उन्हामुळे कधीही गरगरल्यासारखे जाणवल्यास लगेच पाणी पिता येते. त्यामुळे आराम मिळतो. तसे पाहता सर्वच जण पाण्याची बाटली सोबत घेतात. मात्र, निघण्यास उशीर झाला किंवा घाईगडबडीत पिण्याच्या पाण्याची बाटली घेण्यास विसरतो देखील. त्यामुळे निघण्यापूर्वी या गोष्टी तपासून घ्यायला हव्या.

रुमाल किंवा स्कार्फ

रुमाल किंवा स्कार्फ या दोन गोष्टी आपल्या बॅगेत असायलाच हव्या. उन्हाच्या झळा लागायला सुरुवात झाली की रूमाल किंवा स्कार्फने आपला चेहरा झाकता येतो. यामुळे चेहरा चांगला राहतो. त्वचा काळवंडत नाही.

एखादे फळ किंवा ऊर्जादायक पदार्थ

आजच्या काळात अनेकांचे कार्यालय घरापासून खूप लांब असते. त्यामुळे सार्वजनिक वाहने किंवा कंपनीच्या गाड्यांनी जाण्याचा पर्याय अनेक जण निवडतात. उन्हाळ्यामुळे शरीराचे डिहायड्रेशन झाल्याने शरीराची ऊर्जा लवकर संपते. त्यामुळे आपल्या बॅगेत एखादे फळ किंवा ताबडतोब ऊर्जा देणारे पदार्थ असायला हवे. जे गाडीत बसून किंवा कार्यालयात पोहोचल्या पोहोचल्या डेस्कवर बसून खाता येते. त्यामुळे तुम्हाला गरगरणार नाही किंवा चक्कर आल्यासारखे होणार नाही.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक