किडनी निकामी झाल्यास शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच व्हा सावध 
लाईफस्टाईल

किडनी निकामी झाल्यास शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच व्हा सावध

किडनी हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे. जे रक्त फिल्टर करून शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. म्हणूनच, किडनीचे कार्य सुरळीत चालणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

Krantee V. Kale

किडनी हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे. जे रक्त फिल्टर करून शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. म्हणूनच, किडनीचे कार्य सुरळीत चालणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. परंतु, अनेक कारणांमुळे जसे की, बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते. शरीरात दिसणारे काही सामान्य बदल हे किडनी निकामी झाल्याचे संकेत असू शकतात, म्हणून याकडे दुर्लक्ष करु नका.

किडनी निकामी झाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात?

  • वारंवार लघवी होणे, लघवीमध्ये रक्त येणे किंवा लघवी करताना वेदना होणे. लघवीचा रंग बदलणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकते.

  • पाय, घोटे किंवा चेहऱ्यावर सूज येणे हे किडनीमध्ये सोडियम आणि पाणी जमा झाल्याचे लक्षण असू शकते.

  • जेव्हा किडनी योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो.

  • किडनीच्या आजारामुळे मळमळणे आणि उलट्या होणे यासारख्या समस्या होऊ शकतात.

  • त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी पडणे हे किडनी निकामी झाल्याचे सुरुवातीचे लक्षण आहे. काही वेळा, त्वचेवर पिवळे डाग देखील दिसू शकतात.

शरीरात ही लक्षणे दिसताच वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. आजाराचे वेळीच निदान केल्याने वेळेवर योग्य उपचार केले जाऊ शकतात.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायची?

  • उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे किडनीशी संबधित आजार होण्याचा धोका वाढतो. म्हणून रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी योगा किंवा ध्यान करा.

  • मधुमेह हा किडनीच्या आजाराचे एक प्रमुख कारण आहे, म्हणून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात असले पाहिजे.

  • लठ्ठपणामुळे किडनीवर दबाव पडतो, म्हणून वजन कमी करा.

  • नियमित व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, वजन कमी होते आणि किडनी निरोगी राहते.

  • भरपूर पाणी प्यायल्याने किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

IndiGoची मोठी घोषणा; प्रवाशांचे पैसे परत मिळणार, री-शेड्युलिंग शुल्क शून्य

नाशिकच्या १८०० झाडांवर कुऱ्हाड? मनसेनंतर आदित्य ठाकरेंची एंट्री; भाजप-बिल्डर लॉबीवर घणाघात, "भाजपच्या बिल्डर मित्रांची...

Thane : भिवंडीत डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धांजली बॅनरचा अपमान; दोघांविरोधात गुन्हा दाखल

महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबेडकरांना अभिवादन; "त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत...

नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीवर मनसे आक्रमक, अमेय खोपकर म्हणाले, 'एकाही झाडाला...