Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमेला बनवा स्वादिष्ट मसाला दूध; जाणून घ्या सोपी रेसिपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमेला बनवा स्वादिष्ट मसाला दूध; जाणून घ्या सोपी रेसिपी

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरीच बनवा बदाम, पिस्ता, केशर आणि वेलचीच्या स्वादाने भरलेले मसाला दूध! जाणून घ्या स्वादिष्ट मसाला दूध बनवण्याची सोपी रेसिपी, साहित्य आणि खास टिप्स.

किशोरी घायवट-उबाळे

कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की चंद्रप्रकाशात मसाला दूध पिण्याची परंपरा आठवते. यंदा रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या खास रात्रीसाठी तुम्हीही घरी मसाला दूध बनवण्याचा विचार करत असाल, तर ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा. बदाम, पिस्ता, वेलची आणि केशराचा सुगंध यामुळे दुधाला छान चव येते. थंड किंवा गरम, आपल्या आवडीनुसार हे दूध सर्व्ह करू शकता.

मसाला दूध बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • ४ कप दूध

  • अर्धा कप साखर (आवडीनुसार कमी-जास्त करू शकता)

  • १० ते १२ बदाम

  • १० ते १२ पिस्ते

  • पाव टीस्पून जायफळ पूड

  • पाऊण टीस्पून वेलची पूड

  • २ टेबलस्पून फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय

  • २ टीस्पून गुलाबजल

  • चिमूटभर केशर

मसाला दूध बनवण्याची कृती :

१. सर्वप्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. मध्यम आचेवर दूध उकळू द्या. दूध पातेल्याला लागणार नाही यासाठी अधूनमधून चमच्याने ढवळत राहा.

२. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात साखर घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत दूध ढवळा.

३. आता केशराच्या काड्या हाताने किंचित चुरडून दुधात घाला. त्यानंतर वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

४. बदाम आणि पिस्ते बारीक चिरून किंवा जाडसर कुटून घ्या. हे मिश्रण दुधात घालून पुन्हा ढवळा.

५. त्यानंतर दुधात फ्रेश क्रीम किंवा साय घाला. मंद आचेवर काही मिनिटे दूध उकळू द्या, जेणेकरून सर्व मसाल्यांचा स्वाद दुधात छान मिसळेल.

६. शेवटी गुलाबजल घालून मिश्रण व्यवस्थित ढवळा आणि गॅस बंद करा. तयार मसाला दूध ग्लासमध्ये काढा. वरून बदाम-पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्यांनी सजवा.

७. स्वादिष्ट मसाला दूध गरम किंवा थंड करून सर्व्ह करा.

मसाला दूध बनवताना लक्षात ठेवा या टिप्स :

  • सुकामेवा जाडसर ठेवा : बदाम आणि पिस्ते अगदी बारीक पावडर करण्याऐवजी जाडसर कुटल्यास दुधाला छान टेक्स्चर मिळते.

  • केशराचा स्वाद वाढवा : केशराच्या काड्या थोड्या कोमट दुधात भिजवून नंतर मिश्रणात घातल्यास त्यांचा रंग आणि सुगंध दुधात चांगला उतरतो.

  • साखर आवडीनुसार घाला : दूध उकळल्यानंतर साखर घालून चव तपासा. आवश्यकतेनुसार तिचे प्रमाण कमी-जास्त करा.

  • दूधावर सतत लक्षात ठेवा : दूध उकळताना अधूनमधून ढवळा आणि आच मध्यम ते मंद ठेवा, त्यामुळे दूध पातेल्याला लागण्याची शक्यता कमी होते.

  • थंड मसाला दूध हवे असल्यास : दूध पूर्ण थंड झाल्यानंतर झाकून फ्रिजमध्ये ठेवा. सर्व्ह करण्यापूर्वी एकदा ढवळा.

  • गुलाबजल शेवटी घाला : दूध गॅसवरून उतरवण्यापूर्वी किंवा गॅस बंद केल्यानंतर गुलाबजल घातल्यास त्याचा सुगंध टिकून राहण्यास मदत होते.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय