You Tube - Screen Shot - Kimchi (Vegetarian version)
लाईफस्टाईल

रोजचं जेवण खाऊन कंटाळा आलाय? काही तरी वेगळं हवंय? मग ट्राय करा कोरियन 'किम्ची', रेसिपी आहे खूप सोपी

भारतात कोरियन किम्ची ही खूप लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे हा शाकाहारी पदार्थ आहे. कोरियन डिश 'व्हेज किम्ची' ही सामान्यतः साइड डिश म्हणून खाल्ली जाते. चला जाणून घेऊया काय आहे रेसिपी...

Kkhushi Niramish

रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलाय आणि तुम्हाला काही तरी वेगळं खायचं मन करतंय? तर कोरियन किम्ची ट्राय करा. हा पदार्थ घरी बनवणे खूप सोपे आहे. सध्या भारतात कोरियन किम्ची खूप लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे हा शाकाहारी पदार्थ आहे. कोरियन डिश 'व्हेज किम्ची' ही सामान्यतः साइड डिश म्हणून खाल्ली जाते. चला जाणून घेऊया काय आहे रेसिपी...

चटणी बनवण्यासाठी साहित्य:

संपूर्ण लाल मिरच्या ६, लसूण पाकळ्या ६, आले, पाणी - ३ कप, टोमॅटो केचप - १ कप, साखर १ चमचा

भाज्यांसाठी साहित्य :

चिनी कोबी - ४०० ग्रॅम, भारतीय कोबी, ४०० ग्रॅम, मुळा १, गाजर ४, कांदा - ४, मीठ - २ टेबलस्पून, थंड पाणी - २ लिटर, तीळ दोन चमचे

किम्ची कशी बनवायची?

व्हेज किम्ची तीन स्टेप्समध्ये बनवतात.

स्टेप १: व्हेज किम्ची बनवण्यासाठी, प्रथम लाल मिरचीची चटणी बनवून घ्या. गॅस चालू करा आणि एका पॅनमध्ये ३ कप पाणी घाला आणि त्यात संपूर्ण लाल मिरच्या, काही लसूण पाकळ्या, आले घाला आणि चांगले शिजवा. जेव्हा ते पाण्यात चांगले उकळते तेव्हा ते मिक्सर जारमध्ये ठेवा. यासोबत, व्हिनेगर - ¾ कप, टोमॅटो केचप - ¾ कप आणि 1 टेबलस्पून साखर घाला आणि याची पेस्ट करून घ्या. किम्चीसाठीची चटणी तयार आहे.

स्टेप २: आता पुढच्या पायरीमध्ये चायनीज कोबी, भारतीय कोबी, मुळा, गाजर आणि हिरवा कांदा गोल आकारात कापून घ्या. आता एका मोठ्या पातेल्यात पाणी घाला, त्यात मीठ घाला आणि या भाज्या घाला. पाणी उकळू लागले की, गॅस बंद करा आणि पातेले खाली उतरवा. यातील गरम पाणी काढून टाका. तसेच सर्व भाज्या थंड पाण्याने धुवा आणि नंतर एका मोठ्या प्लेटमध्ये चांगले पसरवा. लक्षात ठेवा की, भाज्यांमधील पाणी शोषून घ्यायला हवे.

स्टेप ३: आता, पुढच्या पायरीमध्ये या भाज्यांवर लाल मिरचीची पेस्ट किंवा चटणी आणि पांढरे तीळ घाला आणि ते एकमेकांमध्ये चांगले मिसळा. तुमची कोरियन व्हेज किम्ची तयार आहे. तुम्ही ते भातासोबत किंवा रोटीसोबत खाऊ शकता.

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

महायुतीच ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबईत युती तर अन्यत्र स्वबळावर लढण्याचे संकेत

आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढवायची नाही; काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या विधानानंतर खळबळ

राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरची चाके रुतली, मोठी दुर्घटना सुदैवाने टळली

BARC च्या बनावट वैज्ञानिकाला अटक; अणूबॉम्बच्या आराखड्यासह सुरक्षा भंगाचा संशय