(Photo-@sanjeevkapoor)
लाईफस्टाईल

Leftover Chicken Recipe : स्ट्रीट फूडची चव घरीच! झटपट बनवा मसालेदार एग-चिकन रोल! वाचा सोपी रेसिपी

अंड्याचा लेयर, मसालेदार चिकन, कांद्याची क्रंच आणि चाट मसाल्याचा चटका, या सगळ्यांचा मिलाफ म्हणजे चविष्ट आणि झटपट तयार होणारा रोल. ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळचा स्नॅक म्हणून ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे.

किशोरी घायवट-उबाळे

एखाद्यावेळी घरी बनवलेली चिकन करी शिल्लक राहिली तर पुन्हा तीच करी खाण्याचा कंटाळा येतो. मग अशावेळी त्या उरलेल्या चिकन करीपासून झटपट आणि चविष्ट असा स्ट्रीट-स्टाइल एग-चिकन रोल तयार करता येऊ शकतो. अंड्याचा लेयर, मसालेदार चिकन, कांद्याची क्रंच आणि चाट मसाल्याचा चटका, या सगळ्यांचा मिलाफ म्हणजे चविष्ट आणि झटपट तयार होणारा रोल. ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळचा स्नॅक म्हणून ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे.

साहित्य :

  • उरलेली चिकन करी - २ कप

  • पोळ्या/रोटी - ४

  • अंडी - ४

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - ४ टीस्पून

  • कापलेला कांदा - वरून भुरभुरण्यासाठी

  • चिली व्हिनेगर - वरून घालण्यासाठी

  • चाट मसाला

  • लाल तिखट

कृती :

चिकन करीतील चिकनचे तुकडे वेगळे काढून ते बारीक चिरून घ्या. एका बाऊलमध्ये अंडी फोडून त्यात मीठ घालून चांगले फेटून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये १ टीस्पून तेल गरम करा. त्यावर अंड्याचे मिश्रण पसरवा आणि १ मिनिट शिजवा. त्यावर लगेच एक रोटी ठेवा. १ मिनिट शिजवून उलटवा आणि ३० सेकंद शिजवा. उरलेल्या रोट्याही अशाच प्रकारे तयार करा. त्यानंतर रोटीवर चिरलेले चिकन पसरवा. त्यावर थोडी करी, कांदा, चिली व्हिनेगर, चाट मसाला आणि लाल तिखट भुरभुरा. रोटीचा घट्ट रोल करून त्याचे दोन तुकडे करा आणि गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

  • रोल अधिक रसाळ हवा असल्यास थोडी मेयोनीज किंवा ग्रीन चटणीही लावू शकता.

  • जास्त तिखटपणा हवा असल्यास हिरवी मिरची किंवा स्पायसी सॉस घाला.

  • पोळीऐवजी पराठा वापरल्यास रोल अधिक क्रिस्पी लागेल.

  • लंचबॉक्ससाठी फॉइलमध्ये घट्ट गुंडाळून ठेवा.

  • उरलेली चिकन करी नसल्यास ड्राय चिकन भुर्जीही वापरू शकता.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स