लाईफस्टाईल

लिव्हर डॅमेज टाळायचंय? ब्लॅक कॉफीपासून हळदीपर्यंत 'या' गोष्टींचा आहारात करा समावेश, वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

फेब्रुवारी २०२६ मध्ये केलेल्या एका संशोधनानुसार, भारतामध्ये फॅटी लिव्हरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यावर उपचार न घेतल्यास फॅटी लिव्हरमुळे फायब्रोसिस किंवा लिव्हर कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

किशोरी घायवट-उबाळे

फेब्रुवारी २०२६ मध्ये केलेल्या एका संशोधनानुसार, भारतामध्ये फॅटी लिव्हरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यावर उपचार न घेतल्यास फॅटी लिव्हरमुळे फायब्रोसिस किंवा लिव्हर कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. मात्र, योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे पाच पदार्थ कोणते, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

ब्लॅक कॉफी :

ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिन असते. संशोधनानुसार कॅफिन लिव्हर आजारांची क्षमता वाढण्यापासून रोखू शकते. त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

ब्लूबेरीज :

ब्लूबेरीजमध्ये ‘अँथोसायनिन्स’ हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक दाह कमी करण्यास मदत करतात आणि लिव्हर पेशींना संरक्षण देतात.

आवळा :

आवळा व्हिटॅमिन सी (Vitamin C) ने समृद्ध असून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतो. दररोज दोन आवळा खाल्ल्याने दाहामुळे होणारे नुकसान कमी होऊ शकते, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

अवोकॅडो :

अवोकॅडोमध्ये ग्लुटाथायोन (Glutathione) हा घटक आढळतो. हा घटक लिव्हर पेशींच्या पुनर्निर्मितीस आणि दुरुस्तीस मदत करतो. त्यामुळे फॅटी लिव्हरमधील ऑक्सिडेशन कमी होण्यास हातभार लागतो.

हळद आणि काळी मिरी

हळद आणि काळी मिरी एकत्र घेतल्यास त्यांचा दाहशामक परिणाम अधिक प्रभावी होतो. हे मिश्रण लिव्हरमधील सूज कमी करून नुकसान टाळण्यास मदत करते.

जीवनशैलीतील बदलही महत्त्वाचा

तज्ज्ञांच्या मते, केवळ काही पदार्थ खाल्ल्यानेच फॅटी लिव्हर पूर्णपणे बरा होत नाही. नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, संतुलित आहार आणि वेळेवर तपासणी याही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. जीवनशैलीत वेळेत बदल केल्यास भविष्यातील गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.

फॅटी लिव्हर हा आरोग्याचा वाढता धोका असला तरी योग्य आहार आणि सजग जीवनशैलीमुळे त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी वरील पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

Mumbai : खड्डे भरण्यासाठी यंदा पुन्हा १०० कोटींच्या निविदा; रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावर भर देणार

घाटकोपर जलाशय दुरुस्ती पूर्ण; १० एप्रिलपासून नियमित पाणीपुरवठा सुरू

सुनेत्रांविरुद्ध उमेदवार देण्याचा काँग्रेसला हक्क; संजय राऊत यांच्याकडून समर्थन; पार्थ पवारांवर टीका

वाढीव महागाई भत्त्यासाठी निवासी डॉक्टर आक्रमक; दोन दिवसांत परिपत्रक जारी करा; अन्यथा शुक्रवारपासून आंदोलन

यंदा पाऊसही रुसणार; 'स्कायमेट'चा अंदाज