फोटो सौ : FPJ
लाईफस्टाईल

वजन कमी करताय? मग 'ही' फळे खाणे टाळा

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जीममध्ये भरपूर व्यायाम करत असतात, त्यासोबतच योग्य आहार देखील पाळत असतात.

Krantee V. Kale

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जीममध्ये भरपूर व्यायाम करत असतात, त्यासोबतच योग्य आहार देखील पाळत असतात. पण तरीदेखील म्हणावे तसे वजन कमी झालेले दिसत नाही. पण वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात कोणती फळे खाणे टाळले पाहिजे याबाबत अनेकांना माहिती नसते. बरेच लोक सर्व प्रकारची फळे खातात. पण थांबा.. काही अशी फळेही आहेत जी वजन कमी करताना खाऊ नयेत.

केळं
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात केळं जास्त खातात. केळं हे ऊर्जा देणारे फळ आहे, परंतु त्यामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होत नाही. वजन कमी करायचे असेल तर तुम्ही केळं खाणे टाळले पाहिजे.

आंबा
आंबा हे असे एक फळ आहे जे प्रत्येकाला आवडते. कारण आंबा खायला खूप गोड आणि चविष्ट लागतो. आंब्याच्या सीझनमध्ये प्रत्येकच्या घरामध्ये आंबा आवर्जुन खाल्ला जातो. पण आंब्यामध्ये नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात असते. एका आंब्यामध्ये सुमारे १५० कॅलरीज असतात. त्यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे वजन कमी करताना आंबा खाऊ नये.

द्राक्ष
द्राक्ष दिसायला जरी लहान असली तरी द्राक्ष्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असते. १०० ग्रॅम द्राक्षांमध्ये अंदाजे ७० ते ७५ टक्के कॅलरीज असतात. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर द्राक्षे खाणे थोडे दिवस टाळले पाहिजे.

चेरी
चेरीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर चेरी खाणेही टाळा. जर तुम्ही चेरी अतिप्रमाणात खात असाल तर वजन कमी करण्यावर परिणाम होऊ शकतो.

खजूर

खजूर हा एक सुका मेवा आहे. त्यात साखर आणि कॅलरीज दोन्ही जास्त प्रमाणात आढळतात. जर तुम्ही रोज जास्त प्रमाणात खजूर खात असाल तर वजन कमी होणार नाही. त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात खजूर शक्यतो टाळा.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन