(Photo-@sanjeevkapoor)
लाईफस्टाईल

मराठवाडा स्टाईल येसूर मसाला मटण करी; घरच्या घरी बनवा स्पेशल डिश, जाणून घ्या रेसिपी

भाकरी, कांदा आणि लिंबासोबत सर्व्ह केली जाणारी ही डिश सणवार, पाहुणचार किंवा विकेंड स्पेशल मेनूसाठी परफेक्ट ठरते. जाणून घ्या याची सविस्तर रेसिपी.

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्रीयन जेवणात झणझणीत मटणाच्या रस्स्याला खास स्थान आहे. हाडांसकट शिजवलेले मटण, भाजलेल्या खोबऱ्याचा खमंग स्वाद आणि सुगंधी मसाल्यांचा मिलाफ, यामुळे तयार होते खास येसूर मसाला मटण करी. भाकरी, कांदा आणि लिंबासोबत सर्व्ह केली जाणारी ही डिश सणवार, पाहुणचार किंवा विकेंड स्पेशल मेनूसाठी परफेक्ट ठरते. जाणून घ्या याची सविस्तर रेसिपी.

साहित्य :

मटण उकळण्यासाठी :-

  • मटण (हाडांसकट, २ इंच तुकडे) - ७५० ग्रॅम

  • मीठ - चवीनुसार

  • हळद - अर्धा टीस्पून

  • अख्खे मसाले - आवडीनुसार (२-३ तमालपत्र, जिरे, मोहरी, दालचिनी)

वाटणासाठी :-

  • भाजलेल्या लसूण पाकळ्या - १० ते १५

  • लवंगा - ७ ते ८

  • दालचिनी - अर्धा इंच

  • भाजलेले सुके खोबरे - अर्धा कप

  • मिरी - ५ ते ६

  • चौकोनी कापून भाजलेले कांदे - २ मध्यम

रस्स्यासाठी :-

  • तेल - ३ ते ४ टेबलस्पून

  • दालचिनी - अर्धा इंच

  • तमालपत्र - २

  • बारीक चिरलेले कांदे - २ मोठे

  • मीठ - चवीनुसार

  • आले-लसूण पेस्ट - दीड टेबलस्पून

  • जिरेपूड - १ टीस्पून

  • धणेपूड - १ टीस्पून

  • हळद - अर्धा टीस्पून

  • लाल तिखट - १ टीस्पून

  • येसूर मसाला - २ टेबलस्पून (चणाडाळ, तांदूळ, बाजरी, धणे, काळीमीरी, लवंग भाजून मिक्सरमध्ये वाटून केलेली पावडर)

  • कोथिंबीर - आवडीनुसार

सर्व्ह करण्यासाठी :-

  • भाकरी

  • कांदा

  • लिंबाचे तुकडे

कृती :

प्रथम मटण मीठ, हळद आणि अख्ख्या मसाल्यांसह उकळून घ्या. भाजलेला लसूण, लवंग, दालचिनी, खोबरे, मिरी आणि कांदे मिक्सरमध्ये घालून बारीक वाटण तयार करा. कढईत तेल गरम करून दालचिनी आणि तमालपत्राची फोडणी द्या. त्यात चिरलेले कांदे आणि मीठ घालून सोनेरी होईपर्यंत परता. आले-लसूण पेस्ट घालून १ ते २ मिनिटे परता. तयार वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता. जिरेपूड, धणेपूड, हळद, लाल तिखट घालून छान परता. उकळलेले मटण घालून २ मिनिटे मिक्स करा. ३ कप मटण घालून उकळी येऊ द्या. झाकण ठेवून ६ ते ८ मिनिटे शिजवा. शेवटी येसूर मसाला घालून ३ ते ४ मिनिटे उकळा. कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

  • खोबरे आणि कांदे भाजल्याने रस्स्याला खास स्मोकी फ्लेवर येतो.

  • मटण हाडांसकट घेतल्यास चव अधिक छान लागते.

  • येसूर मसाला शेवटी घातल्यास सुगंध टिकतो.

  • जास्त तिखट हवे असल्यास लाल तिखटचे प्रमाण वाढवा.

  • मंद आचेवर शिजवल्यास मटण अधिक मऊ होते.

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Cyber Fraud Alert : तुम्हालाही व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान... APK फाइलमुळे क्षणात खातं होईल रिकामं

दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी ५ जणांवर गुन्हा, सहलीत निष्काळजीपणा; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

डेटा लीकप्रकरणी HDFC बँक अधिकाऱ्यांची चौकशी