टरबूजचे साल फेकून देता? थांबा अशी बनवा टेस्टी भाजी Freepik
लाईफस्टाईल

टरबूजचे साल फेकून देता? थांबा अशी बनवा टेस्टी भाजी; जाणून घ्या रेसिपी

टरबूज प्रमाणेच याच्या सालात सुद्धा अनेक पौष्टिक तत्व असतात. जी तुमच्या शरीराला उत्तम पोषण देतात. टरबूजच्या सालापासून खूप छान भाजी तयार करता येते. चला तर मग पाहूया टरबूजच्या सालींची चविष्ट भाजी कशी बनवावी.

Kkhushi Niramish

उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. काही ठिकाणी उकाडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात फ्रूट सॅलडमध्ये कलिंगड किंवा टरबूज-खरबूजची जोडी असलेल्या फ्रूट प्लेट्सचे स्टॉल दिसयाला सुरुवात झाली आहे. तसेच टरबूज-खरबूज विक्रीसाठी नजरेस पडत आहे. टरबूज हे फळ उन्हाळ्यात खाणे खूप फायदेशीर ठरते. यामध्ये अनेक पौष्टिक तत्व आहेत. मुख्यत्वे करून उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून हे फळ सर्वोत्तम असते. कारण यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. मात्र, टरबूज खाऊन त्याचे साल फेकून देण्यात येते. तुम्हीही असे करत असाल तर थांबा. टरबूज प्रमाणेच याच्या सालात सुद्धा अनेक पौष्टिक तत्व असतात. जी तुमच्या शरीराला उत्तम पोषण देतात. टरबूजच्या सालापासून खूप छान भाजी तयार करता येते. चला तर मग पाहूया टरबूजच्या सालींची चविष्ट भाजी कशी बनवावी.

विशेष चव नसल्याने मनासारखा मसाला वापरता येतो

टरबूजच्या सालला फारशी चव नसते. विशेष चव नसल्याने तुम्ही या सालापासून पाहिजे त्या मसाल्यात भाजी बनवू शकता आणि तुमच्या आवडीच्या चवीप्रमाणे ही भाजी बनवू शकतात. म्हणजे तुम्ही गरम मसाला, खडा मसाला अशा कोणत्याही मसाल्यात यापासून भाजी बनवू शकता. आवडत असेल तर आलं, लसून, कोथिंबीर, खोबरं, टमाटे, कांदा यांचा वापर करून यापासून भाजी बनवू शकता. अथवा केवळ गरम मसाल्यातही ही भाजी बनवता येते. मसाला कोणताही टाकला तरी बडीशेप टाकायला विसरू नका. कारण बडीशेपमुळे या भाजीला सुंदर चव येते.

कृती

टरबूजचे साल चांगले धुवून घ्या. त्यानंतर बटाटा सोलतो त्याप्रमाणे वरचे हिरवे आवरण काढून घ्या. तसेच टरबूजचा लालसर गर सुद्धा संपूर्ण काढून घ्या. आता याचे छोटे-छोटे तुकडे करा किंवा बारीक कापून घ्या.

कढई किंवा पॅनमध्ये तेल टाकून तुम्हाला हवी तशी फोडणी द्या. त्यानंतर टरबूजचे बारीक केलेले तुकडे पॅनमध्ये टाकून चांगले बदमी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. आता यामध्ये तुम्हाला आवडतो तो मसाला घालून पुन्हा थोडे फ्राय करून घ्या. त्यानंतर पाणी अॅड करून वरून झाकण लावून भाजी चांगली शिजू द्या. टरबूजच्या सालापासून केलेली ही भाजी दिसायला अनेकदा दुधी भोपळ्याच्या भाजीप्रमाणे दिसे. ही भाजी पूर्णपणे रस्स्याची आणि सुकी भाजी अशा दोन्ही प्रकारे बनवता येते.

तर आता जर तुम्ही उन्हाळ्यात टरबूज खाणार असाल तर साल फेकून न देता एकदा याची भाजी करून पाहा.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती