मलायका अरोरा रोज पिते कोरफडीचं पाणी; पन्नाशीतही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कायम 
लाईफस्टाईल

मलायका अरोरा रोज पिते कोरफडीचं पाणी; पन्नाशीतही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कायम

पन्नाशीतही मलायका अरोराच्या चेहऱ्यावर इतका नैसर्गिक ग्लो कसा टिकून आहे? तिच्या रोजच्या सकाळच्या या सवयीमागचं सोपं रहस्य जाणून घ्या…

Mayuri Gawade

वयाच्या पन्नाशीनंतरही चेहऱ्यावर ताजेपणा आणि नैसर्गिक तेज कायम ठेवणाऱ्या मलायका अरोराचा फिटनेस आणि ब्यूटी रूटीन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतं. तिच्या या ग्लोइंग स्किनमागे महागडी प्रॉडक्ट्स नाहीत, तर एक अगदी सोपा आणि घरगुती उपाय आहे.

शिस्तबद्ध जीवनशैलीचं गमक

मलायका तिच्या फिटनेससाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर देते. कुठेही असली तरी या दोन गोष्टी ती कटाक्षाने पाळते. मात्र, तिच्या सौंदर्यामागे आणखी एक छोटासा पण प्रभावी सिक्रेट आहे.

कोरफडीचा रोजचा वापर

अलीकडेच ‘कर्ली टेल्स’शी बोलताना मलायकाने सांगितलं की, ती रोज सकाळी ताजी कोरफड तोडून त्यातील गर काढते आणि तो पाण्यात मिसळून पिते. बाजारात उपलब्ध असलेल्या कोरफडीच्या ज्यूसपेक्षा घरच्या ताज्या कोरफडीला ती अधिक प्राधान्य देते. यामध्ये कधी कधी ती भिजवलेले चिया सीड्स किंवा सब्जा सीड्सही घालते, ज्यामुळे या ड्रिंकचे पोषणमूल्य अधिक वाढते.

त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर

कोरफड केवळ त्वचेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन A, C, B12 आणि E यांसारखे घटक असतात. तसेच मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि अमिनो ॲसिडही मिळतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.

पचन सुधारून वाढतं तेज

कोरफडीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पचन व्यवस्थित झालं की त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

महागड्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सपेक्षा हा सोपा आणि घरगुती उपाय करून पाहिल्यास त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळवणं शक्य होऊ शकतं.

(Disclaimer : या लेखातील माहिती ही सार्वजनिक स्रोत, सेलिब्रिटींचे अनुभव आणि सर्वसाधारण ज्ञानावर आधारित आहे. ‘नवशक्ति’ या माहितीची अचूकता किंवा परिणामकारकता याची हमी देत नाही. कोणताही घरगुती उपाय, आहारातील बदल किंवा आरोग्यविषयक सवय सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी