वयाच्या पन्नाशीतही इतकी एनर्जेटिक? मलायका अरोराचा 'हा' मॉर्निंग हेल्थ शॉट आहे यामागचं गुपित! 
लाईफस्टाईल

वयाच्या पन्नाशीतही इतकी एनर्जेटिक? मलायका अरोराचा 'हा' मॉर्निंग हेल्थ शॉट आहे यामागचं गुपित!

अलीकडेच मलायकाने तिच्या फिटनेस सीक्रेटबद्दल सांगताना पचन संस्थेला सर्वात जास्त महत्त्व असल्याचं स्पष्ट केलं. तिच्या मते, पचन संस्था चांगली असेल तर संपूर्ण शरीर योग्य पद्धतीने काम करतं. पचनसंस्था केवळ अन्न पचवण्यापुरती मर्यादित नसून, ती इम्युनिटी, एनर्जी लेव्हल आणि मूडवरही थेट परिणाम करते.

Mayuri Gawade

बॉलिवूडमधील फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा वयाच्या पन्नाशीनंतरही तिच्या तंदुरुस्ती, ग्लो आणि ऊर्जेमुळे नेहमीच चर्चेत असते. वय वाढत असताना अनेकांना पचनाच्या तक्रारी, थकवा, गॅस, अ‍ॅसिडिटी यांचा सामना करावा लागतो; मात्र मलायका आजही या सगळ्यापासून दूर आहे. यामागचं कारण म्हणजे तिची शिस्तबद्ध जीवनशैली आणि अतिशय सोपी, पण प्रभावी सकाळची हेल्थ रूटीन.

अलीकडेच मलायकाने तिच्या फिटनेस सीक्रेटबद्दल सांगताना पचन संस्थेला सर्वात जास्त महत्त्व असल्याचं स्पष्ट केलं. तिच्या मते, पचन संस्था चांगली असेल तर संपूर्ण शरीर योग्य पद्धतीने काम करतं. पचनसंस्था केवळ अन्न पचवण्यापुरती मर्यादित नसून, ती इम्युनिटी, एनर्जी लेव्हल आणि मूडवरही थेट परिणाम करते. म्हणूनच ती कोणत्याही क्रॅश डायट किंवा महागड्या सप्लिमेंट्सऐवजी घरगुती उपायांवर भर देते.

मलायकाचा साधा पण प्रभावी मॉर्निंग हेल्थ शॉट

मलायकाचा हा मॉर्निंग हेल्थ शॉट अतिशय सोपा असून तो कोणीही घरी सहज बनवू शकतो. हा हेल्थ शॉट पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी आणि पोट साफ राहण्यासाठी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही महागडी सामग्री लागत नाही.

साहित्य :

  • १ चमचा जिरे

  • १ चमचा ओवा (अजवाइन)

  • १ चमचा बडीशेप

  • १ ग्लास पाणी

  • अर्धा लिंबाचा रस

कृती :

  • जिरे, ओवा आणि बडीशेप हलक्या आचेवर थोडेसे भाजून घ्या.

  • भाजलेले हे तिन्ही पदार्थ एका ग्लास पाण्यात घालून रात्रभर भिजत ठेवा.

  • सकाळी हेच पाणी हलकेसे उकळून घ्या.

  • पाणी थोडे थंड झाल्यावर त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा.

  • हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्या.

हा हेल्थ शॉट का आहे फायदेशीर?

जिरे, ओवा आणि बडीशेप हे तिन्ही घटक पचनासाठी अत्यंत लाभदायक मानले जातात. हे पोटातील गॅस, फुगणे, अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करतात. तसेच पचनक्रिया सुधारून गटमधील चांगल्या बॅक्टेरियांना पोषक वातावरण निर्माण करतात. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि दिवसभर सुस्ती जाणवत नाही.

साध्या सवयी, मोठा परिणाम

मलायका अरोरा नेहमीच सांगते की हेल्दी राहण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नसते. रोजच्या आयुष्यात अशा छोट्या-छोट्या सवयी सातत्याने पाळल्या, तर त्याचा परिणाम दीर्घकाळ दिसतो. तिचा हा मॉर्निंग हेल्थ शॉट याचं उत्तम उदाहरण आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी, मलायकाची ही साधी सवय आपल्यालाही नक्कीच प्रेरणा देणारी आहे. घरच्या घरी, कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने पोट आणि गट हेल्दी ठेवायचं असेल, तर हा हेल्थ शॉट नक्कीच उपयोगी ठरू शकतो.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती ही सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. यातून ‘नवशक्ति’ कोणताही दावा करत नाही.)

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

Iran Israel War : जहाजांचा युद्ध विमा महाग; संघर्षामुळे अतिरिक्त प्रीमियम भरावा लागणार; विमा कंपन्यांचा निर्णय