लाईफस्टाईल

Masala Khakhra : रोजच्या नाश्त्याला द्या नवा ट्विस्ट; घरीच बनवा कुरकुरीत मसाला खाकरा, वाचा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत हलका, कुरकुरीत आणि टिकाऊ पदार्थ हवा असेल तर 'मसाला खाकरा' हा उत्तम पर्याय ठरतो.

किशोरी घायवट-उबाळे

सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत हलका, कुरकुरीत आणि टिकाऊ पदार्थ हवा असेल तर 'मसाला खाकरा' हा उत्तम पर्याय ठरतो. गव्हाचे पीठ, मैदा आणि सुगंधी गरम मसाल्यामुळे तयार होणारा हा खाकरा टेस्टी लागतो. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मसाला खाकरा कसा बनवायचा, जाणून घेऊया.

साहित्य :

  • गव्हाचे पीठ - १ कप

  • मैदा - १ कप

  • गरम मसाला पावडर - १ टीस्पून

  • तेल - २ टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • पाणी किंवा कोमट दूध - आवश्यकतेनुसार

  • तूप (भाजण्यासाठी) - ४ टीस्पून

कृती :

एका भांड्यात गव्हाचे पीठ, मैदा, मीठ आणि गरम मसाला एकत्र चाळून घ्या. त्यात तेल घालून हाताने चांगले मिसळा. पाणी किंवा कोमट दूध घालून मऊसर पीठ मळून घ्या आणि १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर पिठाचे आठ समान गोळे करा. प्रत्येक गोळा पातळ पोळीप्रमाणे लाटा. जाड तवा गरम करून मंद आचेवर पोळी भाजायला ठेवा. पोळीला दोन्ही बाजूंनी थोडे तूप लावा आणि लाकडी चमच्याने दाबून कुरकुरीत होईपर्यंत भाजा. दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी रंग आला की खाकरा तयार. पूर्ण थंड झाल्यावर एअरटाइट डब्यात साठवून ठेवा.

टिप्स :

  • खाकरा खूप पातळ लाटला तर जास्त कुरकुरीत होतो.

  • मंद आचेवर भाजल्यास खाकरा समान भाजतो.

  • लाटताना कोरडे पीठ जास्त लावू नका नाहीतर खाकरा कडक होऊ शकतो.

  • पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात ठेवा, नाहीतर ओलावा येऊन खाकरा मऊ होईल.

  • चव वाढवण्यासाठी थोडे लाल तिखट किंवा कसुरी मेथी घालू शकता.

  • मसाला खाकरा चहा, लोणचे, दही किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व्ह केल्यास अधिक चविष्ट लागतो. प्रवासामध्ये खाण्यासाठी हा उत्तम स्नॅक आहे.

महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर ईडीचे छापे; टोल वसुली अन्यत्र वळवल्याचा संशय

मतदारांची नावे वगळणे न्यायालयाने थांबवावे; कपिल सिब्बल यांची मागणी

२०० वर्षांनी घरात जन्माला आली मुलगी; ढोल-ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढत लेकीचे जंगी स्वागत

भावाच्या मृत्यूप्रकरणी अद्याप FIR नाही; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल

एसटी आता 'विना वाहक'; महामंडळाची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी मनुष्यबळ खर्चात कपात