लाईफस्टाईल

पावसाळ्यात पाणी पिण्याची काळजी घ्या; कावीळ, डायरिया आणि कॉलरापासून बचावासाठी 'या' टिप्स पाळा

पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता सर्वाधिक असते. पावसाचे पाणी नाले, सांडपाणी किंवा इतर घाणीबरोबर मिसळल्याने ते अशुद्ध होते. अशा दूषित पाण्यामुळे कावीळ, डायरिया, कॉलरा, टायफॉईड यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे या हंगामात पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

नेहा जाधव - तांबे

पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता सर्वाधिक असते. पावसाचे पाणी नाले, सांडपाणी किंवा इतर घाणीबरोबर मिसळल्याने ते अशुद्ध होते. अशा दूषित पाण्यामुळे कावीळ, डायरिया, कॉलरा, टायफॉईड यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे या हंगामात पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

पाणी का दूषित होते?

पावसाळ्यात नळाच्या किंवा विहिरीच्या पाण्यात पावसामुळे साचलेले घाण पाणी मिसळते. यामुळे पाण्यात हानिकारक बॅक्टेरिया, विषाणू आणि परजीवी जीव वाढतात. हे सूक्ष्मजंतू शरीरात गेल्यावर गंभीर आजार उद्भवू शकतात.

सुरक्षित पाणी पिण्यासाठी उपाय

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खालील साधे उपाय अवलंबल्यास पावसाळ्यातील पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येतो -

पाणी उकळून प्या : पाणी किमान ५-१० मिनिटे उकळल्यास त्यातील हानिकारक जीवाणू मरतात. हे सर्वात सुरक्षित आणि सोपी पद्धत आहे.

तुरटी फिरवा : पाण्यात तुरटी फिरवल्याने त्यातील दूषित घाण तळाला साचते. उरते ते चांगले, स्वच्छ पाणी. हे पाणी पिण्यासाठी योग्य असते.

पाणी फिल्टर करा : घरात वॉटर फिल्टर असल्यास त्याचा वापर करून पाणी गाळून घ्या. बाजारात उपलब्ध असलेल्या आरओ, यूव्ही फिल्टरचा वापर फायदेशीर ठरतो.

पाण्याची टाकी स्वच्छ ठेवा : पावसाळ्यात पाण्याच्या टाक्या लवकर दूषित होतात. त्यामुळे टाकी नियमितपणे स्वच्छ धुवावी.

हातांची स्वच्छता : पिण्याचे पाणी हाताळताना किंवा जेवणाआधी हात नीट साबणाने धुणे अत्यावश्यक आहे.

बाटलीबंद पाण्याचा पर्याय : बाहेरगावी प्रवास करताना किंवा पिण्याच्या पाण्याची खात्री नसल्यास नेहमी बाटलीबंद पाणी वापरावे.

आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

डॉक्टर सांगतात की पावसाळ्यात पोटदुखी, उलटी, जुलाब, ताप, पिवळसर डोळे किंवा त्वचेवर पिवळेपणा दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. पाणी सुरक्षित ठेवले तर पावसाळ्यातील अर्ध्याहून अधिक आजारांपासून बचाव होऊ शकतो.

पावसाचा रुद्रावतार! मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी; वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त, रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा

वाहतूककोंडीत अडकल्यावर प्रवाशांनी टोल का द्यावा? सर्वोच्च न्यायालयाने NHAI ला खडसावले

SIR हे मतचोरीचे नवे हत्यार - राहुल गांधी

CEC भाजपच्या प्रवक्त्यांसारखे काम करतात! विरोधकांचा हल्लाबोल

राधाकृष्णन यांनी घेतली मोदींची भेट