पिझ्झा खायचाय, पण मैदा नको? मग घरच्या घरी बनवा मूगडाळीचा हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

पिझ्झा खायचाय, पण मैदा नको? मग घरच्या घरी बनवा मूगडाळीचा हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा

मैद्याचा पिझ्झा खाणं टाळत असाल, तर मूगडाळीपासून बनणारा हा हेल्दी पिझ्झा नक्की ट्राय करा. प्रोटीन आणि फायबरने युक्त हा पदार्थ चविष्ट असून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतो.

Mayuri Gawade

पिझ्झा म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद खुलतो. मात्र, मैद्यापासून तयार होणारा पिझ्झा आरोग्यासाठी फारसा चांगला मानला जात नसल्याने अनेक जण तो खाणं टाळतात. पण जर चव आणि आरोग्य यांचा उत्तम मेळ साधायचा असेल, तर मूगडाळीचा पिझ्झा हा एक भन्नाट पर्याय ठरू शकतो.

प्रोटीन आणि फायबरने भरपूर असलेला हा पिझ्झा चवीलाही तितकाच सरस आहे. विशेष म्हणजे, तो घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतो. त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा विकेंड स्पेशल पदार्थ म्हणूनही हा पर्याय नक्कीच ट्राय करता येईल.

साहित्य

  • दीड कप मूग डाळ (रात्रभर भिजवलेली)

  • अर्धा इंच आलं

  • २ हिरव्या मिरच्या

  • एक चिमूट बेकिंग पावडर

  • चवीनुसार मीठ

  • थोडं तेल

  • पिझ्झा सॉस

  • बारीक चिरलेली शिमला मिरची

  • उकडलेला मका

  • पनीरचे छोटे तुकडे

  • बारीक चिरलेला कांदा

  • मशरूमचे स्लाईस

  • १ ते २ जॅलेपिनो स्लाईस

  • किसलेलं मोझरेला चीज

  • रेड चिली फ्लेक्स

  • ड्राय ऑरेगॅनो

कृती

मूग डाळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी डाळ, आलं, हिरव्या मिरच्या, मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. या मिश्रणाचं घट्ट आणि मऊसर बॅटर तयार करा.

हे बॅटर एका भांड्यात काढून त्यात बेकिंग पावडर मिसळा. नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर बॅटर घाला आणि जाडसर पॅनकेकप्रमाणे पसरवा. थोडं तेल सोडून एका बाजूने ते भाजून घ्या.

त्यानंतर बेस उलटून त्यावर पिझ्झा सॉस लावा. शिमला मिरची, मका, कांदा, मशरूम, पनीर आणि जॅलेपिनो घाला. वरून भरपूर मोझरेला चीज पसरवा.

आता झाकण ठेवून मंद आचेवर चीज वितळेपर्यंत शिजवा. तयार पिझ्झा प्लेटमध्ये काढून त्यावर रेड चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो भुरभुरा. गरमागरम मूगडाळ पिझ्झाचा आस्वाद घ्या.

का ट्राय कराल हा पिझ्झा?

मैद्याऐवजी मूगडाळ वापरल्यामुळे हा पिझ्झा प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्रोत ठरतो. त्यामुळे चवीसोबत पौष्टिकतेचीही काळजी घेतली जाते. घरातील लहान मुलांपासून फिटनेसची काळजी घेणाऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी हा हेल्दी पर्याय ठरू शकतो.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग