Freepik
लाईफस्टाईल

सकाळी व्यायामानंतर करा 'हे' काम; गुडघेदुखी-कंबरदुखी होईल गायब

पोषक तत्त्वांची कमतरता असलेला आहार हे याचे मुख्य कारण आहे. पौष्टिक आहार न घेतल्याने शरिरात अनेक वेळा Vitamin D ची कमतरता निर्माण होते. परिणामी गुडघेदुखी-कंबरदुखी सारखे त्रास होतात. जाणून घ्या हाडांच्या आरोग्यासाठी Vitamin D चे काय आहे महत्त्व आणि Vitamin D ची उणीव भरून काढण्यासाठी काय आहे घरगुती उपाय...

Kkhushi Niramish

धावपळीची जीवनशैली, अपुरी झोप, कॉस्मेटिक्सचा अतिरेकी वापर यामुळे अनेक जणांना आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. यामध्ये एक प्रमुख समस्या म्हणजे गुडघेदुखी-कंबरदुखी यांसारखे आजार अगदी तरुण वयात होत आहे. पोषक तत्त्वांची कमतरता असलेला आहार हे याचे मुख्य कारण आहे. पौष्टिक आहार न घेतल्याने शरिरात अनेक वेळा Vitamin D ची कमतरता निर्माण होते. परिणामी गुडघेदुखी-कंबरदुखी सारखे त्रास होतात. जाणून घ्या हाडांच्या आरोग्यासाठी Vitamin D चे काय आहे महत्त्व आणि Vitamin D ची उणीव भरून काढण्यासाठी काय आहे घरगुती उपाय...

Vitamin D चे महत्त्व

Vitamin D हाडे आणि दात, रोगप्रतिकारक शक्ती, मेंदूचे आरोग्य आणि जळजळ नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे. Vitamin D आपण घेतलेल्या आहारातून कॅल्शियम शोषूण घेण्यास प्रोत्साहन देते आणि रक्तात कॅल्शियम आणि फॉस्फरसची पुरेशी पातळी राखण्यास मदत करते, जे निरोगी हाडे आणि दातांसाठी आवश्यक आहे.

कंबरदुखी-गुडघेदुखी

कंबरदुखी-गुडघेदुखी हे शरिरातील हाडे बळकट नसल्यामुळे किंवा कमकुवत झाल्यामुळे होणारे आजार आहे. हाडे निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. आहारातून कॅल्शियम शोषूण घेण्याचे काम Vitamin D करते. त्यामुळे Vitamin D ची पूर्तता केल्याने कंबरदुखी आणि गुडघेदुखीत खूप आराम मिळतो.

Vitamin D ची उणीव कशी भरून काढणार?

Vitamin D ची उणीव डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या विविध औषधांच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. मात्र, त्यासोबतच जोडीला आहार आणि सकाळच्या उन्हात शेक घेणे हे सर्वोत्तम उपाय आहेत. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश आहे. अशा वेळी सकाळच्या उन्हात गुडघे आणि कंबरेला शेक घेतल्याने Vitamin D ची उणीवर भरून निघते. कसे ते जाणून घ्या.

सूर्यप्रकाशातून Vitamin D कसे मिळते?

सूर्यप्रकाशाच्या प्रतिसादात शरीर व्हिटॅमिन डी तयार करते. त्यामुळे चांगला सूर्यप्रकाश घेतल्यास आपल्या शरिराला Vitamin D मिळते. मात्र, असे नाही की तुम्ही कधीही उन्हात बसाल आणि तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल. व्हिटॅमिन डीसाठी उन्हाळ्यात सकाळी ८ वाजेपर्यंत सूर्यप्रकाश घ्यावा लागतो. हिवाळ्यात सूर्य उशिरा उगवतो म्हणून तुम्ही रात्री ९ वाजेपर्यंत सूर्यस्नान करू शकता. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल. यानंतरचा सूर्यप्रकाश शरीरासाठी हानिकारक असू शकतो. सकाळी व्यायाम केल्यानंतर थोड्यावेळाने सूर्यप्रकाशात बसावे. यामुळे Vitamin D चांगले तयार होते.

Vitamin D च्या पूर्ततेसाठी कोणता आहार घ्यावा?

गायीच्या दुधात व्हिटॅमिन डी आढळते. तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नक्की करा. मशरूम, संपूर्ण धान्य, तृणधान्ये, अंडी, संत्र्याचा रस यांसारख्या वनस्पती-आधारित पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. तुम्ही तुमच्या आहारात या गोष्टींचे सेवन वाढवू शकता.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती