Mother’s Day 2026 : 'मदर्स डे'ला आईसाठी काय घ्याल? वाचा युनिक गिफ्ट आयडियाज 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Mother’s Day 2026 : 'मदर्स डे'ला आईसाठी काय घ्याल? वाचा युनिक गिफ्ट आयडियाज

Mother’s Day 2026 निमित्त आईसाठी खास, युनिक गिफ्ट आयडिया जाणून घ्या. महागड्या गिफ्टपेक्षा प्रेम, वेळ आणि भावना व्यक्त करणाऱ्या खास भेटवस्तूंची यादी.

किशोरी घायवट-उबाळे

आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी महागडं गिफ्टच हवं असं नाही. मदर्स डे म्हणजे आईला "तू आमच्यासाठी किती खास आहेस" हे जाणवून देण्याचा दिवस. त्यामुळे यंदा नेहमीचे फुले, साडी किंवा चॉकलेट्स देण्यापेक्षा थोडं वेगळं आणि मनाला भिडणारं गिफ्ट दिलंत, तर आईचा दिवस आणखी खास होऊ शकतो.

अनेक अहवालांनुसार, आईला महागड्या वस्तूंपेक्षा प्रेम, वेळ आणि विचारपूर्वक दिलेली छोटी भेट अधिक आवडते. म्हणूनच, यंदाच्या मदर्स डे निमित्त आईसाठी काही हटके, उपयोगी आणि भावनिक स्पर्श असलेल्या खास गिफ्ट आयडिया जाणून घेऊया.

1. पर्सनलाइज्ड फोटो बुक

आईसोबतचे खास क्षण, जुने फोटो आणि छोट्या आठवणी एकत्र करून तयार केलेलं फोटो बुक हे कायम जपून ठेवण्यासारखं सुंदर गिफ्ट ठरू शकतं.

2. 'आईसाठी वेळ' हेच परफेक्ट गिफ्ट

आईसोबत एक दिवस पूर्ण तिच्या मनाप्रमाणे घालवा. तिच्या आवडीचं जेवण, फिरणं किंवा निवांत गप्पा हा कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त खास अनुभव ठरू शकतो.

3. हँडमेड लेटर जार

'आई, तू माझ्यासाठी खास का आहेस' अशा छोट्या चिठ्ठ्या एका सुंदर जारमध्ये भरून द्या. हे साधं पण खूप भावनिक गिफ्ट आहे.

4. होम स्पा किट

अरोमा कँडल, फेस मास्क, बाथ सॉल्ट आणि स्किनकेअर प्रॉडक्ट्ससह तयार केलेलं होम स्पा किट आईला घरच्या घरी आरामाचा अनुभव देऊ शकतं.

5. कस्टमाइज्ड किचन गिफ्ट

आईच्या नावाचा मग, एप्रन, रेसिपी बुक किंवा चॉपिंग बोर्ड हे रोजच्या वापरातील आणि उपयोगी गिफ्ट ठरू शकतं.

'मदर्स डे'चं खरं महत्त्व गिफ्टच्या किमतीत नसून त्यामागच्या भावनेत असतं. आईला दिलेला थोडा वेळ, प्रेमाने लिहिलेली एक चिठ्ठी किंवा तिचा ताण कमी करणारी छोटी कृतीही तिच्यासाठी सर्वात मोठी भेट ठरू शकते. त्यामुळे यंदा आईसाठी गिफ्ट घेताना 'किती महाग?' यापेक्षा 'किती मनापासून?' याचा नक्की विचार करा.

IIT Bombay Student Suicide Case : साहिल वाकोडेचे वडील पोलिसांच्या ताब्यात; उपोषणासाठी IIT बॉम्बेकडे जाताना रोखले

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

काळजाचा थरकाप! यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला आग, ९ जणांचा मृत्यू, चालक-वाहकावर प्रवाशांचा गंभीर आरोप

Ulhasnagar : स्वीकृत नगरसेवक निवडीला पुन्हा ‘ब्रेक’! आठ महिन्यांची प्रतीक्षा आणखी वाढली

ठाणे शहराला साथीच्या आजारांचा विळखा! दोन महिन्यांत मलेरियाचे २०८, तर डेंग्यूचे १३८ रुग्ण