Sweets Recipe: राष्ट्रीय डोनट दिवस दरवर्षी जूनच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो. यंदा हा दिवस आज ७ जून रोजी साजरा केला जातोय. डोनट हे जगभर प्रसिद्ध आहे आणि डोनटची लोकप्रियता लक्षात घेऊन दरवर्षी राष्ट्रीय डोनट दिवस साजरा केला जातो. डोनट्स जगभरातील लाखो लोकांचा आवडता पदार्थ आहे.
नॅशनल डोनट डे सेलिब्रेट करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या कुटुंब आणि मित्रांना डोनट्स बनवून खायला देते. अनेकांना डोनट्स बनवणे सोप्पे वाटत नाही. पण तुम्ही सहज डोनट्स घरी बनवू शकता. हे डोनट्स बनवायला तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण ते खाल्ल्यानंतर तुमच्या प्रियजनांनच्या चेहऱ्यावर छान हसू फुलेल.
लागणारे साहित्य
मैदा - २ कप
यीस्ट - १/२ टीस्पून
पिठी साखर - १ कप
तळण्यासाठी तेल - ४ चमचे
मीठ - आवश्यकतेनुसार
बेकिंग पावडर - १/२ टीस्पून
बटर - २ चमचे
जाणून घ्या कृती
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात कोमट पाण्यात यीस्ट भिजवा आणि आता मैदा चाळून घ्या.
आता त्यात बटर, साखर, चिमूटभर मीठ आणि बेकिंग पावडर मिक्स करा.
आता या मिश्रणात यीस्ट घाला आणि पीठ चांगले मळून घ्या.
या पीठाची मोठी जाड चपाती लाटून डोनट कटरने किंवा काचेच्या सहाय्याने गोल कापून डोनटचा आकार बनवा.
सर्व डोनट्स त्याच पद्धतीने तयार करा.
नंतर हे तयार केलेले डोनट्स ४ ते ६ तास झाकून ठेवा. यामुळे डोनट्स छान फुलतील.
आता एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि डोनट्स दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.
नंतर सर्व बाजूंनी त्यावर चॉकलेट सिरप घाला आणि वरून पिठीसाखर शिंपडा.
तुमचे चविष्ट आणि चॉकलेट डोनट्स तयार आहेत.