प्रातिनिधिक छायाचित्र - सौजन्य - Facebook Physical Therapy Session
लाईफस्टाईल

Neck Hump : नेक हंपच्या समस्येने त्रस्त आहात? हे व्यायाम प्रकार करून पाहा

आजच्या धावत्या जीवनशैलीच्या काळात अनेकांना नेक हंपची (Neck Hump) समस्या होत आहे. त्यामुळे अनेकांना आपले सौंदर्य कमी झाले आहे असे, वाटून मनात न्यूनगंड निर्माण होतो. नेक हंपमुळे अनेकांना झोपण्यासाठी देखील त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जाणून घ्या काय आहे नेक हंप? यामागची कारणे आणि काय आहेत उपाय?

Kkhushi Niramish

आजच्या धावत्या जीवनशैलीच्या काळात अनेकांना नेक हंपची (Neck Hump) समस्या होत आहे. त्यामुळे अनेकांना आपले सौंदर्य कमी झाले आहे असे, वाटून मनात न्यूनगंड निर्माण होतो. नेक हंपमुळे अनेकांना झोपण्यासाठी देखील त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जाणून घ्या काय आहे नेक हंप? यामागची कारणे आणि काय आहेत उपाय?

नेक हंप (Neck Hump) काय आहे?

जेव्हा बरोबर मानेच्याखाली आणि पाठीच्यावर जमा झालेल्या फॅटमुळे फुगीर भाग किंवा उंचवटा तयार होतो. त्याला नेक हंप म्हणतात.

काय आहेत कारणे?

नेक हंप होण्याचे प्रमुख कारण चुकीची जीवनशैली हे आहे. यामध्ये उठणे, बसणे आणि चालण्याची चुकीची पद्धत हे महत्त्वाचे कारण आहे. तर दुसरे सातत्याने बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणे हे देखील एक कारण आहे. सर्वात जास्त मान खाली घालून काम करणे नेक हंप येण्यासाठी कारणीभूत मानले जाते. तसेच सातत्याने चमचमीत पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते. वजन वाढल्यामुळे देखील नेक हंपची समस्या निर्माण होते. हल्ली सर्वच जण मोबाईलवर रील बघण्यात तासनतास घालवतात. यावेळी त्यांना आपण खाली मान घालून मोबाईल बघत आहोत याची जाणीव राहत नाही. त्यामुळे देखील नेक हंपची समस्या उद्भवते.

काय आहेत उपाय?

नेक हंपसाठी चुकीची जीवनशैली उठणे, बसणे आणि चालण्याच्या चुकीच्या पद्धती. मोबाईल-टीव्ही बघत असताना खाली मान घालून पाहणे. कामाच्या ठिकाणी संगणकावर काम करताना मान खाली घालून काम करणे या गोष्टी कारणीभूत आहे. त्यामुळे या चुकीच्या सवयी मोडणे हा यावरील सर्वोत्तम आणि बिनखर्चिक उपाय आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून बसणे, ताठ चालणे, मोबाईलवर रील पाहताना तुमची मान खाली करून न पाहता मोबाईलला सरळ डोळ्यासमोर हातात घेऊन पाहणे किंवा मोबाईलस्टँडवर ठेवून मोबाईल पाहणे हे सर्वोत्तम असते.

कोणते व्यायाम कराल?

नेक हंप माने खाली होत असल्याने त्याचा सरळ संबंध खांद्यांसोबत असतो. त्यामुळे खांद्यांशी संबंधित व्यायाम केल्याने नेक हंपमध्ये चांगला फरक पडू शकतो. याशिवाय मानेचे व्यायाम केल्याने देखील नेक हंप कमी होतो. हात-खांदे आणि मान यावर हलका ताण पडेल असे व्यायाम केल्याने नेक हंप कमी होण्यास मदत होते.

कोणते आसन करावेत?

नेक हंपची समस्या दूर करण्यासाठी भूजंगासन, शलभासन आणि गोमुखासन करणे फायदेशीर ठरते. या तिन्ही आसन प्रकारात मानेला ताण पडतो. गोमुखासनात मान तसेच हात यावर देखील ताण पडून त्याचा फायदा नेक हंप कमी होण्यासाठी होतो.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड