फोटो सौ : FPJ
लाईफस्टाईल

ना वडापाव, ना पाणीपुरी! 'या' तीन पदार्थांनी मिळवली जगातील ५० बेस्ट स्ट्रीट फूड्सच्या यादीत जागा

भारताच्या लोकप्रिय स्ट्रीट फूड्समध्ये वडापाव आणि पाणीपुरीचे नाव नेहमीच घेतले जाते, पण जगातील ५० बेस्ट स्ट्रीट फूड्सच्या यादीत भारताच्या तीन इतर लोकप्रिय पदार्थांनी स्थान मिळवले आहे.

Krantee V. Kale

भारताच्या लोकप्रिय स्ट्रीट फूड्समध्ये वडापाव आणि पाणीपुरीचे नाव नेहमीच घेतले जाते, पण जगातील ५० बेस्ट स्ट्रीट फूड्सच्या यादीत भारताच्या तीन इतर लोकप्रिय पदार्थांनी स्थान मिळवले आहे. टेस्टअटलस या प्रसिद्ध ऑनलाइन फूड गाईडने ही यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय पदार्थ, विशेषतः परोठा, कुल्चा आणि छोले भटूरे या तीन पदार्थांना वरचे स्थान दिले गेले आहे.

परोठा हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे जो की स्वादीष्ट आणि पोषणयुक्त आहे. तर उत्तर भारतातील अमृतसरी कुल्चा आणि छोले भटूरेही या यादीत समावीष्ट केले आहेत. त्यामुळे आता या पदार्थांना जागातील टॉप ५० स्ट्रीट फूड्सच्या यादीत स्थान मिळाले आहे.

या यादीत पाचव्या स्थानावरील असलेला आणि क्रिस्पी लेयर्स असलेला परोठा हा अत्यंत चवदार दक्षिण भारतीय पदार्थ आहे, तमिळनाडू आणि केरळमधील गल्ल्यांमध्ये तो मोठ्या प्रमाणात विकला जातो. परोठा फक्त स्ट्रीट फूड नसून तो दक्षिण भारतातील एक मुख्य खाद्यपदार्थ देखील आहे. दक्षिण भारतात परोठा साधारणतः चिकन किंवा मटण करीसोबत खाल्ला जाते. आता त्याला जागतिक स्तरावर स्थान मिळाले आहे.

परोठा

सातव्या स्थानावर असलेला अमृतसरी कुल्चा हा उत्तर भारतातील आतिथ्याचा एक चवदार पदार्थ आहे. तंदूरमध्ये भाजलेले खमंग कुल्चा भारतातील अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. याच्या प्रत्येक तुकड्यात अप्रतिम चव आहे. गोल्डन टेम्पलच्या स्वयंपाकघरांतून या पदार्थाची सुरुवात झाली आहे. कुल्चा हा फक्त स्ट्रीट फूड नाही, तर पंजाबच्या लोकांचा सर्वात जास्त आवडीचा एक खाद्यपदार्थही आहे.

अमृतसरी कुल्चा

या यादीत चाळीसव्या स्थानावर असलेला छोले भटूरे हा पदार्थ उत्तर भारतातील एक प्रसिद्ध स्ट्रीटफूड म्हणून ओळखला जातो. नाश्त्यासाठी आवडता पदार्थ असलेला हा पदार्थ चवीला अप्रतीम आहे. मऊ आणि फुगीर भटूरे, मसालेदार आणि तिखट छोले यामूळे याची चव जीभेवर रेंगाळते. राजधानी दिल्लीमध्ये या पदार्थाची लोकप्रियता जास्त प्रमाणात असून ऑफिस कॅंटीनपासून ते रस्त्यांवरच्या ढाब्यांपर्यंत सर्वच ठिकाणी हा पदार्थ विकला जातो.

छोले भटूरे

जगातील नंबर १ स्ट्रीट फूड कोणते आहे?

भारताच्या या तीन चवदार पदार्थांनी या यादीत स्थान मिळवले आहेच, पण या यादीत जगातील नंबर १ चे स्थान गाठले आहे ते 'गारंटिता' या अल्जीरियाच्या एका पदार्थांने, तसेच या यादीत आशियातील चायनीज, इंडोनेशियन सिओमाय, मेक्सिकोचे चीज आणि मांसयुक्त क्युसेबिर्रिया या चवदार पदार्थांचा समावेश आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास