लाईफस्टाईल

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहतात? आता NHAI चा डिजिटल लोकल पास मिळवा RajmargYatra App वरून, जाणून घ्या डिटेल्स

टोल प्लाझापासून २० किमी परिसरात राहणाऱ्या वाहनचालकांसाठी NHAI ने RajmargYatra App वर Digital Local Pass आणि MargMitra Help Centre सुविधा सुरू केली आहे. घरबसल्या अर्ज कसा करायचा आणि कोणाला याचा लाभ मिळणार, जाणून घ्या.

Mayuri Gawade

दररोज राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी टोल प्लाझावरील रांगा आणि मासिक लोकल पास काढण्यासाठी करावी लागणारी धावपळ ही मोठी डोकेदुखी ठरते. आता ही कटकट कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) RajmargYatra अ‍ॅपवर Digital Local Pass ही नवी सुविधा सुरू केली आहे. यामुळे टोल प्लाझावर न जाता घरबसल्या लोकल पाससाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय MargMitra नावाचा AI आधारित हेल्प सेंटरही सुरू करण्यात आला असून FASTag आणि महामार्गाशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण एका ठिकाणी करता येणार आहे.

Digital Local Pass म्हणजे काय?

या सुविधेमुळे टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना RajmargYatra अ‍ॅपवरूनच मासिक लोकल पाससाठी अर्ज करता येणार आहे. पास मंजूर झाल्यानंतर त्याच्या वैधतेच्या कालावधीत संबंधित टोल प्लाझावरून अमर्यादित प्रवास करता येईल. यासाठी प्रत्यक्ष टोल प्लाझावर जाऊन कागदपत्रे जमा करण्याची गरज भासणार नाही.

अर्ज कसा पडताळला जाणार?

अर्ज करताना वापरकर्त्याची संमती घेतल्यानंतर विविध सरकारी प्लॅटफॉर्मच्या मदतीने माहिती पडताळली जाईल.

  • DigiLocker द्वारे पत्त्याची पडताळणी

  • VAHAN डेटाबेसमधून वाहनाची माहिती

  • FASTag ची स्वतंत्र पडताळणी

  • GIS तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्जदार टोल प्लाझापासून २० किमी परिसरात राहतो का, याची खात्री

सध्या कुठे सुरू आहे ही सुविधा?

सध्या ही सेवा दिल्लीतील मुंडका-बक्करवाला टोल प्लाझा येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यांत देशातील इतर टोल प्लाझांवरही ही सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे.

MargMitra AI काय आहे?

RajmargYatra अ‍ॅपमध्ये MargMitra नावाचे AI आधारित हेल्प सेंटरही सुरू करण्यात आले आहे. हे फीचर २२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून, वापरकर्ते टाइप करून किंवा बोलून प्रश्न विचारू शकतात.

MargMitra द्वारे कोणत्या सुविधा मिळणार?

या AI हेल्प सेंटरच्या मदतीने...

  • FASTag रिचार्जशी संबंधित अडचणी

  • KYC संबंधित माहिती

  • रिफंड स्टेटस तपासणे

  • वार्षिक आणि लोकल पासची माहिती

  • FASTag ब्लॅकलिस्ट स्टेटस

  • ई-नोटीस तपासणे

  • राष्ट्रीय महामार्गावरील बंद पडलेली वाहने, अतिक्रमण किंवा इतर समस्यांची तक्रार नोंदवणे

  • तक्रारीची स्थिती रिअल टाइममध्ये ट्रॅक करणे

  • समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अपील दाखल करणे

अशा अनेक सुविधा एकाच अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

UPI Payment साठी इंटरनेटची गरज नाही! २००० रुपयांपर्यंत ऑफलाइन व्यवहाराची सुविधा, जाणून घ्या...

महाराष्ट्रासाठी डेल्टा कायदा प्रस्तावित; कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती गठित करण्याचे फडणवीसांचे निर्देश

Mumbai : धरणांच्या नदीपात्रात गढूळ पाणी; पाणी गाळून, उकळून पिण्याचे पालिकेचे आवाहन