instagram - manishmalhotra05
लाईफस्टाईल

नीता अंबानींच्या 'या' साड्यांची होत आहे चर्चा; डिझाईनर मनिष मल्होत्राची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

भारतीय फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राने इंस्टाग्रामवर नीता अंबानी यांच्या आकर्षक पोशाखांची माहिती शेअर केली. परंपरेला कालातीत ग्लॅमरशी जोडणाऱ्या नीता अंबानींच्या दोन्ही आकर्षक साडी लूकवर बारकाईने नजर टाकूया.

Kkhushi Niramish

रिलायन्स फाऊंडेशच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी कायमच भारताच्या समृद्ध कापड वारशाचे समर्थन केले आहे. अनेकदा त्यांनी विविध भव्य कार्यक्रमात देशातील कारागिरांकडून हाताने विणलेल्या साड्या नेसून त्यांना सन्मानित केले आहे. तसेच या साड्यांमध्ये त्यांनी विशेष कार्यक्रम केले आहे. वनतारा उद्घाटन सोहळ्यात त्यांची अलिकडची उपस्थिती अपवाद नव्हती, कारण त्यांनी पुन्हा एकदा प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वनतारा या महत्त्वाकांक्षी प्राणी कल्याण उपक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ मार्च रोजी अंबानी कुटुंबाच्या उपस्थितीत केले. हा कार्यक्रम मुळातच भव्य होता. मात्र, नीता यांच्या कपड्यांच्या निवडी पुन्हा एकदा प्रमुख आकर्षण ठरल्या. भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने इंस्टाग्रामवर त्यांच्या आकर्षक पोशाखांची माहिती शेअर केली. परंपरेला कालातीत ग्लॅमरशी जोडणाऱ्या नीता अंबानींच्या दोन्ही आकर्षक साडी लूकवर बारकाईने नजर टाकूया.

'नऊ-मोटिफ डबल इकत पटोला' साडी

वनतारा उद्घाटन सोहळ्यासाठी नीता यांच्या पहिल्या लूकमध्ये एक भव्य 'नऊ-मोटिफ डबल इकत पटोला' साडी होती. या पारंपारिक प्रकारच्या साडीला "नऊ-आकृती अदतला डिझाइन" म्हणून ओळखले जाते. ही साडी गुजरातच्या कापड कलात्मकतेचे हृदय आहे. गुंतागुंतीच्या रेझिस्ट-डाईंग तंत्राचा वापर करून बनवलेली ही उत्कृष्ट कलाकृती राजश्रृंगार साडींमधून मिळवली गेली आणि ती पूर्ण करण्यासाठी सात महिने लागले, अशी माहिती मनिष मल्होत्राने दिली आहे. सात कुशल कारागिरांनी सममितीय नक्षी विणण्यासाठी काटेकोरपणे काम केले. ज्यामुळे या वारसा कलाकृतीच्या निर्मितीमध्ये समाविष्ट असलेल्या अपवादात्मक कारागिरीवर प्रकाश पडला.

साडीला आणखी उंची मिळावी म्हणून नीता यांनी जोडीला एक उत्कृष्ट हिऱ्याची अंगठी आणि अत्यंत दुर्मिळ शंख मोत्यांनी सजवलेला स्टेटमेंट गणेश हार घातला आहे. शाही आकर्षणात भर घालत, त्यांनी त्यांच्या मनगटावर पारंपारिक बांगड्या रचल्या आणि त्यांचा मेकअप मऊ आणि सौम्य ठेवला. यावर त्यांनी केसांची विशेष हेअर स्टाईल न करता ते मोकळे सोडले आहे. त्यामुळे केसांनी आणि डोक्यावरील नाजूक बिंदीने संपूर्ण लूक पूर्ण केला.

बंगालच्या मुर्शिदाबादची सिल्क साडी

नीता यांनी नेसलेली दुसरी साडी बंगालच्या समृद्ध रेशमी साडीच्या कापडाच्या वारशाकडे आपल्याला घेऊन जाते. त्यांनी स्वतःला मुर्शिदाबादच्या एका आकर्षक सिल्क साडीत सजवले. हाताने विणलेल्या आणि स्वदेश ऑनलाइन वरून मिळवलेल्या या साडीत नारंगी आणि गुलाबी रंगाच्या चमकदार रंगांमध्ये क्लिष्ट हँड-ब्लॉक प्रिंटिंग होते.

या साडीवर हिरव्या पन्नाने मढवलेल्या राजेशाही कुंदन नेकलेसने, जुळणाऱ्या स्टड इयररिंग्जसह त्यांचा लूक आणखी उंचावला. त्यांच्या बांगड्यांमध्येही परंपरेचा स्पर्श होता. तर आकर्षक अंडाकृती आकाराच्या सनग्लासेसमुळे त्याला आधुनिक टच दिला. जोडीला केसांमध्ये नाजूक गजरा माळून सजवलेल्या सुंदर साईड-स्वीप्ट बनने त्यांचा लूक परिपूर्ण केला.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत