लाईफस्टाईल

घरीच पार्टी करताय? स्नॅक्समध्ये नक्की ठेवा फ्लॉवर मंच्युरियन; झटपट तयार होणारं कुरकुरीत स्टार्टर!

कमी वेळात तयार होणारं, हे मंच्युरियन पार्टीसाठी स्टार्टर म्हणूनही आणि संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणूनही मस्त लागते.

Mayuri Gawade

घरी पार्टी करायचं म्हंटलं की एकच प्रश्न सतत डोक्यात फिरतो, स्नॅक्समध्ये काय बनवायचं? बाहेरून मागवण्यापेक्षा घरच्या घरीच झटपट, कुरकुरीत आणि सगळ्यांना आवडेल असा पदार्थ बनवायचा असेल, तर फ्लॉवर मंच्युरियन हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. चटपटीत सॉस आणि कुरकुरीत फ्लॉवरमुळे तोंडाला पाणी सुटणार हे नक्की. कमी वेळात तयार होणारं, हे मंचुरियन पार्टीसाठी स्टार्टर म्हणूनही आणि संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणूनही मस्त लागते. चला तर मग पाहूया घरच्या घरी झटपट तयार होणाऱ्या कुरकुरीत फ्लॉवर मंच्युरियनची सोपी रेसिपी.

साहित्य

मंच्युरियनसाठी

  • फ्लॉवर - 1 मध्यम (फ्लोरेट्स करून उकडलेले)

  • मैदा - 4 टेबलस्पून

  • कॉर्नफ्लोअर - 3 टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • लाल तिखट - 1 टीस्पून

  • आले-लसूण पेस्ट - 1 टीस्पून

  • पाणी - आवश्यकतेनुसार

  • तेल - तळण्यासाठी

सॉससाठी

  • तेल - 2 टेबलस्पून

  • लसूण - 1 टेबलस्पून (बारीक चिरलेला)

  • आले - 1 टीस्पून (बारीक चिरलेले)

  • हिरवी मिरची - 1 ते 2 (चिरलेली)

  • कांदा - 1 मध्यम (चौकोनी कापलेला)

  • शिमला मिरची - 1/2 कप (चिरलेली)

  • सोया सॉस - 1 टेबलस्पून

  • चिली सॉस - 1 टेबलस्पून

  • टोमॅटो केचप - 1 टेबलस्पून

  • व्हिनेगर - 1 टीस्पून

  • कॉर्नफ्लोअर - 1 टीस्पून (पाण्यात मिसळलेले)

  • मीठ - चवीनुसार

कृती

सर्वप्रथम फ्लॉवरचे तुकडे गरम पाण्यात थोडं मीठ घालून ५ मिनिटे उकडून घ्या आणि पाणी निथळून ठेवा. एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, लाल तिखट, आले-लसूण पेस्ट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ तयार करा. फ्लॉवरचे तुकडे या पिठात नीट घोळवून गरम तेलात सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आता दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले आले, लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्या, त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची घालून उच्च आचेवर १–२ मिनिटे परतवा.

यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप आणि व्हिनेगर घालून नीट मिसळा. सॉस थोडा घट्ट होण्यासाठी कॉर्नफ्लोअरचे पाणी घालून एक उकळी येऊ द्या. शेवटी तळलेले फ्लॉवरचे तुकडे या सॉसमध्ये घालून हलक्या हाताने मिक्स करा, वरून स्प्रिंग ओनियन घालून गरमागरम कुरकुरीत फ्लॉवर मंच्युरियन सर्व्ह करा.

खास टिप्स

  • फ्लॉवर उकडताना फार जास्त शिजवू नका; फक्त ५ मिनिटे उकडल्याने तो तुटणार नाही आणि तळताना कुरकुरीत राहील.

  • पीठ घट्ट ठेवा; पातळ पीठ केल्यास फ्लॉवर तेलात कुरकुरीत न होता मऊ होतो.

  • फ्लॉवर तळताना तेल चांगलं तापलेलं असावं; कमी तापमानात तळल्यास मंच्युरियन तेलकट लागतो.

  • अधिक चायनीज फ्लेवरसाठी सॉसमध्ये थोडंसं चिली ऑइल किंवा काळी मिरी पूड घालू शकता.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती