Photo- Yandex
लाईफस्टाईल

फुटणार नाही, तेलही शोषणार नाही! असे बनवा परफेक्ट कुरकुरीत साबुदाणा वडे, जाणून घ्या सोपी रेसिपी

परफेक्ट साबुदाणा वडा बनवण्यासाठी साबुदाणा भिजवण्यापासून ते तळण्यापर्यंत प्रत्येक पायरी योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने खमंग साबुदाणा वडा बनवू शकता. जाणून घेऊया सोपी आणि झटपट रेसिपी.

Krantee V. Kale

सकाळचा नाश्ता चविष्टही हवा आणि झटपटही तयार हवा. मग, अशा वेळी गरमागरम, कुरकुरीत साबुदाणा वडा एकदम परफेक्ट डिश ठरेल. महाराष्ट्रातल्या घराघरात बनवला जाणारा हा स्नॅक उपवासापुरताच मर्यादित नाही. तर, तुम्ही ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर देखील खाऊ शकता. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, अशी परफेक्ट टेक्स्चर असलेली ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. परफेक्ट साबुदाणा वडा बनवण्यासाठी साबुदाणा भिजवण्यापासून ते तळण्यापर्यंत प्रत्येक पायरी योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने खमंग साबुदाणा वडा बनवू शकता. जाणून घेऊया सोपी आणि झटपट रेसिपी.

साबुदाणा वड्यासाठी लागणारी सामग्री

  • १ कप साबुदाणा (रात्रभर किंवा ५–६ तास भिजवलेला)

  • २ उकडलेले बटाटे (मॅश केलेले)

  • ½ कप भाजलेले शेंगदाणे (जाडसर कुटलेले)

  • आलं-मिरचीची पेस्ट

  • १ चमचा जिरे

  • चवीनुसार मीठ

  • ½ चमचा लाल तिखट

  • ½ चमचा साखर (आवडीनुसार)

  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)

  • लिंबाचा रस

  • तळण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुऊन रात्रभर भिजवत ठेवा. रात्रभर भिजवल्यामुळे साबुदाणा छान नरम होतो. सकाळी भिजलेला साबुदाणा हलक्या हाताने मोकळा करून एका भांड्यात घ्या. आता त्यात उकडलेले बटाटे कुस्करून किंवा किसून घाला. त्यासोबत शेंगदाण्याची कूट, आलं-मिरचीची पेस्ट, मीठ आणि जिरे टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्या. नंतर, यामध्ये लाल तिखट, थोडी साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.

मिश्रण नीट एकत्र केल्यानंतर याचा एकघट्ट गोळा तयार करु घ्या. नंतर, हाताला थोडंसं पाणी लावून या गोळ्याचे छोटे–छोटे भाग घ्या आणि चपटे गोल वडे तयार करा. वडे तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. तेल चांगले तापले की गॅस मध्यम करून वडे तेलात सोडा. एक बाजू तळली की सावधपणे पलटून दुसरी बाजूही खरपूस तळा. सगळे वडे अशाच पद्धतीने तळून घ्या. आता, छान फुललेले आणि खरपूस साबुदाणा वडे तयार आहेत. हे गरमागरम वडे ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

टिप- वडे तळताना कधी कधी साबुदाणे फुटतात, म्हणून वड्यांवर गोल झारा उलटा ठेवला तर तेल उडत नाही आणि सुरक्षितही राहता येते.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...

Mumbai : ChatGPT वापरून बनवला लोकल ट्रेनचा बनावट पास; भन्नाट आयडिया तरुणाच्या अंगलट

Navi Mumbai : मातृत्वाला काळीमा! कळंबोलीत चिमुकलीचा गळा दाबून खून

मुरबाडमध्ये विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; मुख्याध्यापक निलंबित

ठाणे महापालिका निवडणुकीत शाईऐवजी मार्कर