मोजक्या साहित्यात अन् काहीच मिनिटांत तयार होणारे कुरकुरीत पोटॅटो बॉल्स; संध्याकाळच्या चहासाठी परफेक्ट स्नॅक  
लाईफस्टाईल

मोजक्या साहित्यात अन् काहीच मिनिटांत तयार होणारे कुरकुरीत पोटॅटो बॉल्स; संध्याकाळच्या चहासाठी परफेक्ट स्नॅक

संध्याकाळी चहा हातात असताना काहीतरी गरमागरम, कुरकुरीत आणि झटपट खायची इच्छा होत असेल, तर पोटॅटो बॉल्स यापेक्षा बेस्ट पर्याय नाही. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेले हे बॉल्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात.

Mayuri Gawade

संध्याकाळी चहा हातात असताना काहीतरी गरमागरम, कुरकुरीत आणि झटपट खायची इच्छा होत असेल, तर पोटॅटो बॉल्स यापेक्षा बेस्ट पर्याय नाही. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेले हे बॉल्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात.
अचानक पाहुणे आले, मुलांच्या टिफिनसाठी वेगळा स्नॅक हवा किंवा रोजच्या नाश्त्याला थोडा ट्विस्ट द्यायचा असेल, तर ही रेसिपी कमी साहित्यांत, कमी वेळात आणि हमखास यशस्वी ठरते. घरी सहज उपलब्ध असलेल्या बटाट्यांपासून बनणारे हे बॉल्स एकदा केले की पुन्हा-पुन्हा करावेसे वाटतील.

साहित्य :

  • उकडलेले बटाटे (मॅश केलेले)

  • कॉर्नफ्लोर

  • ब्रेड क्रम्ब्स

  • हिरवी मिरची (बारीक चिरलेली)

  • आलं-लसूण पेस्ट

  • लाल तिखट

  • गरम मसाला

  • मीठ

  • कोथिंबीर (चिरलेली)

  • तेल

कृती :

एका भांड्यात उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे घ्या. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून सगळं मिश्रण नीट एकजीव करा. आता या मिश्रणात कॉर्नफ्लोर घालून घट्ट मळून घ्या. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून ते ब्रेड क्रम्ब्समध्ये नीट घोळवा. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे बटाट्याचे बॉल्स सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. तळलेले बॉल्स टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल काढा आणि गरमागरम टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा मेयोनीजसोबत सर्व्ह करा.

टिप्स :

• बॉल्स अधिक कुरकुरीत हवे असतील तर ब्रेड क्रम्ब्ससोबत थोडे कॉर्नफ्लेक्स क्रश करून वापरू शकता.
• मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची कमी किंवा वगळू शकता.
• तळण्याऐवजी एअर फ्रायरमध्येही हे बॉल्स करता येतात.
• बॉल्स फुटू नयेत यासाठी मिश्रण फार सैल ठेवू नका.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती