Raksha Bandhan 2026 : यंदा रक्षाबंधनाचे ३ शुभ मुहूर्त! जाणून घ्या राखी बांधण्याची योग्य वेळ आणि पूजा पद्धत 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2026 : यंदा रक्षाबंधनाचे ३ शुभ मुहूर्त! जाणून घ्या राखी बांधण्याची योग्य वेळ आणि पूजा पद्धत

रक्षाबंधन २०२६ला भावाला राखी बांधण्यासाठी कोणते ३ शुभ मुहूर्त आहेत? जाणून घ्या राखी बांधण्याची पूजा पद्धत, मुहूर्त आणि धार्मिक मान्यता.

Mayuri Gawade

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचा सण. आज, शुक्रवारी २८ ऑगस्टला रक्षाबंधन साजरं केलं जात असून, भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी शुभ वेळ पाहण्याची लगबग सुरू आहे. धार्मिक मान्यतेनुसार शुभ मुहूर्तावर केलेला विधी मंगलकारी मानला जातो.

यंदा भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी ३ विशेष शुभ वेळा सांगितल्या जात आहेत. या मुहूर्तांसोबतच राखी बांधताना नेमकी पूजा कशी करावी आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हेही जाणून घेऊया.

राखी बांधण्यासाठी कोणते ३ मुहूर्त?

  • पहिला शुभ मुहूर्त : सकाळी ५:४५ ते ९:४८

  • दुसरा शुभ मुहूर्त : दुपारी १:४० ते ४:१५

  • तिसरा शुभ मुहूर्त : सायंकाळी ६:२९ ते ८:२२

या तीन वेळांपैकी सोयीचा शुभ मुहूर्त निवडून भावाला राखी बांधता येईल, अशी धार्मिक मान्यता आहे.

राखी बांधण्याची पूजा पद्धत

राखी बांधण्यापूर्वी भावाला पाटावर बसवावे. त्यानंतर त्याच्या कपाळावर कुंकू किंवा गंध लावून अक्षता टाकाव्यात. भावाचे औक्षण करून त्याच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी.

राखी बांधल्यानंतर भावाला मिठाई भरवावी. त्याच्या सुख, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या आनंदाची काळजी घेण्याचं वचन देतो.

शुभ मुहूर्तावर राखी बांधण्याला महत्त्व का?

हिंदू धर्मातील अनेक परंपरांमध्ये कोणतेही शुभ कार्य ठराविक मुहूर्तावर करण्याला महत्त्व दिलं जातं. त्याचप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशीही शुभ वेळेत राखी बांधणे मंगलकारी मानले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये पंचांग पाहून राखी बांधण्याची वेळ निश्चित केली जाते.

२८ ऑगस्टलाच रक्षाबंधन का?

पंचांगानुसार, यंदा पौर्णिमा तिथी २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०८ वाजता सुरू होऊन २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:४७ वाजता समाप्त होणार आहे. त्यामुळे २८ ऑगस्टला रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे. पंचांगकर्त्यांच्या माहितीनुसार, २८ ऑगस्टचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनाचा असणार आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथी जरी समाप्त झाली असेल, तरी तुम्ही दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकता..

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे यंदाही शुभ मुहूर्त पाहून भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधा आणि हा दिवस खास करा.

(टीप : वरील माहिती धार्मिक मान्यता आणि उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. यामधून नवशक्ती कोणताही दावा करत नाही.)

Nepal Floods: महाराष्ट्रातील ८० जण अडकले; केवळ ४-५ जणांशीच संपर्क, मंत्री महाजनांची माहिती; राज्य सरकारकडून हेल्पलाईन सुरू

साखरेचे दर चढेच; देशात सरासरी दर ६५ रुपये किलो

Nepal Floods: भारत नेपाळच्या मदतीला; ३७.५ टन मदतसाहित्य रवाना, १६० हून अधिक मृत्यू, ८०० जणांचा अद्याप ठाव नाही

Mumbai : रेल्वे कॅटरिंग कर्मचाऱ्यांसाठी गणवेश अनिवार्य; मुंबई विभागातील रेल्वे स्टॉल्ससाठी सुधारित नियमावली लागू; पश्चिम रेल्वेचा निर्णय

मानवासाठी ४० टक्के नोकऱ्या राखीव ठेवा; अमेरिकन उद्योगपती बिल गेटस् यांचे आवाहन