लाईफस्टाईल

Ramadan 2026 : आजपासून रमजानची सुरुवात; इफ्तारसाठी बनवा टेस्टी शेवई कस्टर्ड, नोट करा रेसिपी

दिवसभर रोजा ठेवल्यानंतर संध्याकाळी इफ्तारमध्ये पौष्टिक आणि गोड पदार्थ खाल्ले जातात. अशावेळी हलकी, चविष्ट आणि पटकन तयार होणारी शेवई कस्टर्ड ही उत्तम डिश ठरते.

किशोरी घायवट-उबाळे

आजपासून रमजानच्या पवित्र महिन्याची सुरुवात झाली आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा महिना अत्यंत श्रद्धेचा आणि संयमाचा मानला जातो. दिवसभर रोजा (उपवास) ठेवल्यानंतर संध्याकाळी इफ्तारमध्ये पौष्टिक आणि गोड पदार्थ खाल्ले जातात. अशावेळी हलकी, चविष्ट आणि पटकन तयार होणारी शेवई कस्टर्ड ही उत्तम डिश ठरते. चला जाणून घेऊया रमजान महिन्यातील स्पेशल शेवई कस्टर्डची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • भाजलेल्या शेवया - १ कप

  • दूध - १ लिटर

  • कस्टर्ड पावडर (व्हॅनिला/आवडीप्रमाणे) - ३ टेबलस्पून

  • साखर - ४ ते ५ टेबलस्पून

  • चिरलेली फळे (सफरचंद, केळी, डाळिंब) - अर्धा कप

  • ड्रायफ्रूट (बदाम, काजू, पिस्ता) - २ टेबलस्पून

  • वेलची पूड - अर्धा टीस्पून

कृती :

एका भांड्यात दूध उकळण्यासाठी ठेवा. त्यात शेवया घालून मंद आचेवर शिजवा. वेगळ्या वाटीत थोड्या दुधात कस्टर्ड पावडर मिसळा. हे मिश्रण उकळत्या दुधात घालून सतत ढवळा. साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यात वेलची पूड आणि ड्रायफ्रूट घाला. नंतर गॅस बंद करून हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात चिरलेली ताजी फळे मिसळा. फ्रिजमध्ये १ तास ठेवून थंडगार सर्व्ह करा.

टिप्स :

  • कस्टर्ड घालताना सतत ढवळल्यास पावडरच्या गाठी (Lumps) होत नाहीत.

  • फळे नेहमी पूर्ण थंड झाल्यावरच मिसळा.

  • चवीसाठी थोडे कंडेन्स्ड मिल्क घालू शकता.

  • सर्व्ह करतानावरून डाळिंब व ड्रायफ्रूट घालून सजावट करा.

  • थंडगार सर्व्ह केल्यास चव अधिक वाढते.

रमजान महिन्यात इफ्तारमध्ये गोड पदार्थ शरीराला झटपट ऊर्जा देतात. शेवई कस्टर्ड हा हलका आणि सर्वांना आवडणारा डेझर्ट असल्यामुळे घरच्या घरी बनवणे हा उत्तम पर्याय आहे.

Mumbai : समुद्रातील पाण्याची गुणवत्ता सुधारणार; आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

मनोरी प्रकल्पात भूमिगत जलवाहिनीचे जाळे विस्तारणार; जमिनीखाली १२८ मीटर खोल बोगदा खोदणार

लोणावळा कर्जत मार्गावर २४ जुलैपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द

मुंबईत ३,८४१ ठिकाणी झाडे, फांद्या हटवल्या; ५४२ ठिकाणी कार्यवाही प्रगतिपथावर

ही तर अघोषित आणीबाणी! काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची टीका