झटपट आणि कुरकुरीत काहीतरी हवंय? ट्राय करा खमंग रवा पुरी! 
लाईफस्टाईल

झटपट आणि कुरकुरीत काहीतरी हवंय? ट्राय करा खमंग रवा पुरी!

घरात झटपट, खुसखुशीत आणि वेगळा नाश्ता करायचा असेल, तर रवा पुरी हा उत्तम पर्याय आहे. अगदी साध्या साहित्यापासून तयार होणारी ही कुरकुरीत पुरी चहासोबत किंवा स्नॅक्स म्हणून परफेक्ट ठरते.

Mayuri Gawade

घरात काहीतरी झटपट, वेगळं आणि कुरकुरीत खायचं असेल, तर पुरी हा पहिला पर्याय आठवतो. पण रोजचीच मैदा किंवा गव्हाच्या पिठाची पुरी खाऊन कंटाळा आला असेल, तर हा नवा ट्विस्ट नक्की ट्राय करून पाहा. रव्यापासून बनणारी ही खास पुरी चवीला खुसखुशीत आणि हलकी असल्यामुळे एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते.

ही रवा पुरी बनवायला खूप सोपी असून घरातल्या अगदी साध्या साहित्यापासून तयार होते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून हलकी असलेली ही पुरी सण-समारंभ, छोट्या पार्टी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी परफेक्ट ठरते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही चव आवडते.

साहित्य :

  • १ कप बारीक रवा

  • २ टेबलस्पून मैदा

  • १ टेबलस्पून तांदळाचे पीठ

  • मीठ (चवीनुसार)

  • १ टीस्पून ओवा

  • १ टेबलस्पून गरम तेल (मोहनासाठी)

  • पाणी (पीठ मळण्यासाठी)

  • तेल (तळण्यासाठी)

कृती :

सर्वप्रथम एका भांड्यात रवा, मैदा आणि तांदळाचे पीठ एकत्र करा. त्यात मीठ, ओवा आणि गरम तेल घालून चांगलं मिसळा. नंतर थोडं थोडं पाणी घालत कडकसर पीठ मळून घ्या. हे पीठ १५–२० मिनिटं झाकून ठेवा, म्हणजे रवा मऊ होईल.

यानंतर छोटे गोळे करून लाटण्याने लहान पुरी लाटा. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर या पुरी तळा. पुरी छान फुगून सोनेरी रंगाची झाली की बाहेर काढा.

सर्व्ह कसं कराल?

गरमागरम, खुसखुशीत रवा पुरी तयार! ही पुरी तुम्ही चटणी, लोणचं किंवा गरम चहासोबत सर्व्ह केली, तर तिचा स्वाद आणखी वाढतो. एकदा नक्की ट्राय करा. घरच्यांकडून कौतुक हमखास मिळेल!

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग