

उन्हाळ्याची चाहूल लागली की थंडगार आणि गोड काहीतरी खावंसं वाटू लागतं. अशा वेळी बाहेरचं आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेली मटका कुल्फी हा खूपच छान पर्याय ठरू शकतो. चव, सुरक्षितता आणि घरगुतीपणा यांचा सुंदर मेळ या कुल्फीत मिळतो. खास म्हणजे, मटक्यात सेट केलेली कुल्फी खाण्याचा आनंद हा वेगळाच असतो. जुन्या आठवणी जाग्या करणारी ही कुल्फी कमी साहित्यांत आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते.
घरच्या घरी बनवलेल्या कुल्फीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती प्रिझर्वेटिव्ह्जपासून मुक्त असते. तसेच, आपल्या आवडीनुसार त्यात साखरेचं प्रमाण कमी-जास्त करता येतं. सुका मेवा, वेलची किंवा इतर फ्लेवर्स घालून तिची चवही बदलता येते. त्यामुळे ही कुल्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा स्वादिष्ट आणि तुलनेने हेल्दी डेजर्ट पर्याय बनतो.
साहित्य:
दूध
काजू
बदाम
पिस्ता
साखर
वेलची पावडर
मटका किंवा छोटे कप
कृती:
सर्वप्रथम कढईत दूध उकळायला ठेवा आणि ते थोडं आटेपर्यंत मंद आचेवर शिजू द्या.
दरम्यान काजू, बदाम आणि पिस्त्याची बारीक पूड करून घ्या.
दूध घट्ट होऊ लागलं की त्यात सुका मेव्याची पूड घालून चांगलं ढवळा.
वेगळ्या भांड्यात साखर विरघळवून ती या मिश्रणात मिसळा.
यानंतर वेलची पावडर आणि थोडे सुका मेव्याचे तुकडे घालून मिश्रण अधिक चविष्ट करा.
तयार मिश्रण मटक्यात किंवा छोट्या कपांमध्ये भरा.
हे मटके काही तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
कुल्फी व्यवस्थित सेट झाली की थंडगार सर्व्ह करा.
टिप्स:
कुल्फी अधिक रिच आणि क्रीमी हवी असेल तर दूध जास्त वेळ आटवा.
आवडीनुसार केशर, गुलाब इसेन्स किंवा मँगो फ्लेवरही घालू शकता.
साखरेचं प्रमाण आपल्या चवीनुसार कमी-जास्त ठेवा.
सर्व्ह करताना वरून सुका मेवा घातल्यास चव आणखी वाढते.
मटक्यात कुल्फी सेट केल्याने तिची चव आणि सुगंध दोन्ही अधिक छान लागतात.